Pune News, 17 Nov : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे सातत्याने प्रचार सभांच्या माध्यमातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधताना दिसत आहे. अशातच रविवारी अजित पवारांनी शिरूर येथील प्रचार सभेतून अमोल कोल्हेंना प्रत्युत्तर दिलं आहे.
यावेळी त्यांनी अमोल कोल्हेंचा संपूर्ण राजकीय इतिहासच बाहेर काढला. प्रचार सभेत बोलताना अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले, "अलीकडे काही लोकांना फार उत्साह आला आहे. त्यामध्ये आपले शिरूरचे विद्यमान खासदार आहेत. त्या खासदाराची मी हिस्टरी सांगतो. त्यांच्याकडे मी दुर्लक्ष करत होतो.
मात्र, त्यांची कुठलीही सभा असली की, त्यामध्ये माझं गुलाबी जॅकेट त्यांना दिसतं परंतु माझं जॅकेट गुलाबी नाही. त्याचा रंग गुलाबी नसून जांभळ खाल्ल्यानंतर त्याची बी ज्या रंगाची असते त्या रंगाचं माझं जॅकेट आहे. विद्यमान खासदार आमच्यावर सातत्याने टीका करत असून आमच्या निष्ठेबाबत बोलत आहेत.
जे निष्ठेची गोष्ट करत आहेत. त्यांचा राजकीय इतिहास पाहिला तर ते सुरुवातीला मनसे नेते राज ठाकरे यांना भेटले. नंतर 2014 मध्ये त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला. त्यावेळी ते भाषण करताना उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मानाचा मुजरा म्हणून भाषणाची सुरुवात करायचे. सगळं रेकॉर्ड काढा मी काही खोटं बोलत नाही."
2014 ला खासदारकीच्या निवडणुकीमध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघातून (Shirur Lok Sabha Constituency) आढळराव पाटील हे निवडणूक रिंगणात होते. तेव्हा त्यांनी शिवसेनेचे कार्यकर्ते म्हणून भाजपचे (BJP) काम केलं ते त्यांना चालतं. 2014 ला आढळराव पाटलांचा विजय झाल्यानंतर शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमाला बोलताना अमोल कोल्हेंनी खिळखिळ्या झालेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीला संपवू अशी भाषा केली होती.
नंतर 2014 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने न मागता शरद पवारांनी (Sharad Pawar) भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. तेव्हा हेच कोल्हे म्हणाले होते की, 'भाजपने चूक केली असून शरद पवार हे भाजपला शून्य करतील' अशी टीका त्यांनी पवार साहेबांवर केली. नंतर भाजपने पवार साहेबांचा पाठिंबा नाकारून शिवसेनेसोबत सत्ता स्थापन केली.
त्यावेळी कोल्हेंना भाजप चालते. यातून ते किती सोयीचे राजकारण करतात. हे समोर येत आहे, असं अजित पवार म्हणाले. 2014 ते 2019 अमोल कोल्हेंनी वाट पाहिली परंतु आढळराव पाटील यांचे काम चांगलं असल्याने शिरूरमधील उमेदवार उद्धव ठाकरेंनी बदलला नाही. तेव्हा कोल्हे ज्यांना मानाचा मुजरा करत होते, त्यांना जय महाराष्ट्र करून ते आमच्याकडे आले.
मी माझ्या गाडीतून घेऊन जाऊन त्यांचा पक्ष प्रवेश केला आणि तिकीटही दिल. यातून कोल्हे वेळ पाहून आपली भूमिका बदलतात हे दिसून येतं अशी टीकाही त्यांनी कोल्हेंवर केली. जेव्हा आम्ही भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला तेव्हा हे सर्वजण सोबत होते. आमदार अशोक पवार यांनी देखील प्रतिज्ञापत्र करून दिलं.
खासदार अमोल कोल्हे त्या ठिकाणी होते. त्यावेळी ते हसत होते टाळ्या वाजवत होते आणि म्हणत होते की जोरात झालं जोरात झालं नंतर त्यांचा जोर कुठे गेला कोणाला माहिती, असा खोचक टोला अजित पवारांनी लगावला. त्यामुळे सातत्याने निष्ठा बदलणाऱ्या अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांना स्वाभिमानाबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार तरी आहे का? असा सवालही अजितदादांनी या सभेतून उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.