

Maharashtra Exam Fee Waiver Zero Challan: दुष्काळग्रस्त तालुक्यांतील विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी राज्य सरकारने परीक्षा शुल्कमाफीची अंमलबजावणी सुरू केली आहे. या सुविधेचा आतापर्यंत २ लाख ४० हजार ३६५ विद्यार्थ्यांनी लाभ घेतला असून, परीक्षा शुल्क न भरताच अर्ज दाखल केले आहेत. पात्र विद्यार्थ्यांना अर्ज भरताना शुल्क भरण्याची गरज पडू नये, यासाठी ‘झिरो चलन’ (Zero Challan) हा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी ही माहिती दिली.
दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांचे आर्थिक परिस्थितीमुळे शैक्षणिक नुकसान होऊ नये, हा या निर्णयामागील उद्देश आहे. परीक्षा अर्ज भरताना शुल्क भरणे शक्य नसलेल्या पात्र विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी विद्यापीठे आणि संबंधित परीक्षा विभागांच्या माध्यमातून व्यवस्था करण्यात आली आहे.
Zero Challan सुविधेमुळे पात्र विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज सादर करताना शुल्क भरण्याची आवश्यकता नाही. या निर्णयाची अंमलबजावणी सुरळीत व्हावी, यासाठी संबंधित विद्यापीठांनी परिपत्रकेही जारी केली आहेत.
परीक्षा शुल्कमाफीचा निर्णय लागू होण्यापूर्वी ज्या पात्र विद्यार्थ्यांनी परीक्षा शुल्क भरले आहे, त्यांनाही या निर्णयाचा लाभ मिळणार आहे. अशा विद्यार्थ्यांनी भरलेली रक्कम परत करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी आपल्या विद्यापीठाकडे याबाबत चौकशी करावी.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व विद्यापीठांना शुल्कमाफीची अंमलबजावणी योग्य पद्धतीने करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विभागाकडून या प्रक्रियेचा नियमित आढावा घेतला जात आहे.
परीक्षा अर्ज भरताना हा पर्याय उपलब्ध होत नसेल किंवा शुल्कमाफीचा लाभ मिळत नसेल, तर विद्यार्थ्यांनी संबंधित विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाशी संपर्क साधावा. आवश्यकतेनुसार विद्यार्थी विकास विभाग किंवा जनसंपर्क अधिकाऱ्यांकडूनही मार्गदर्शन घेता येईल.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ: डॉ. अंधारे – ९९७५०५५१५५; डॉ. काळवणे – ७०२०६३४५०२
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड: डॉ. हुशारसिंग साबळे – ९९२३४०९४९१; डॉ. चिखलीकर – ८३९०६६६७७७
मुंबई विद्यापीठ: डॉ. पूजा रौंदळे – ९३२२०२०५८९; लीलाधर बनसोड – ९८३३९६९९७७
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ: डॉ. राजेंद्र तलवारे – ९८९०६४२४३१; डॉ. सविता कुलकर्णी – ७७२००३६७७४; अजय ठुबे – ७५८८१६९१३४
शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर: डॉ. अजितसिंग एन. जाधव – ९५४५५९५९९९; अलोक जत्राटकर – ८६९८९२८०८०
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ: डॉ. बाबासाहेब डोळे – ८२३७००६५७२; डॉ. कैलास अंभोरे – ९४२३७०५०८१
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ: डॉ. योगेश पाटील – ९४२३१८५०७३; महाले – ९८२३१९२८३१
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ: डॉ. नितीन कोळी – ९८५००४२३५७; डॉ. राजीव बोरकर – ८८५५०८३९६४
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ: डॉ. अनुप पळसोकर – ८३७८९७४२४०; डॉ. विजय तांगडे – ९५४५११२५५५
गोंडवाना विद्यापीठ:डॉ. नवीन मंगुळे – ९५११९१०५७५; डॉ. प्रिया गेडाम – ९०४९४७४११९
एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठ: संजय नेरकर – ९९२२४४४४६७; डॉ. अंकुश चव्हाण – ९६८९६७२५०९
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ: डॉ. भटूप्रसाद पाटील – ७७९८९२५४८५; महेंद्र बनसोडे – ९७६६०५९०७६
पात्र विद्यार्थ्यांनी शुल्कमाफीचा लाभ मिळवण्यासाठी अर्ज प्रक्रियेतील अडचणी वेळेत सोडवाव्यात, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण विभागाने केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.