Maharashtra GR: सुट्टीत काम करणाऱ्या मुख्याध्यापकांसाठी राज्य सरकारचा सुधारित शासन निर्णय; ३० दिवस उपस्थितीची अट, गैरहजर राहिल्यास रजा मिळणार नाही

Headmaster Leave Rules: महाराष्ट्र सरकारने जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांसाठी सुधारित शासन निर्णय जारी केला आहे. ३० दिवस उपस्थितीच्या अटीवर दरवर्षी १५ दिवस अर्जित रजा मिळणार आहे.
Headmaster Leave Rules
Headmaster Leave RulesSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maharashtra Education News: उन्हाळी आणि दिवाळीच्या दीर्घ सुट्ट्यांमध्येही शाळेची कार्यालयीन कामे, शासकीय अहवाल आणि प्रशासकीय जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आता या मुख्याध्यापकांना प्रत्येक वर्षी १५ दिवसांची अर्जित रजा मिळणार आहे.

ग्रामविकास विभागाने याबाबत सुधारित शासन निर्णय जारी केला असून, या निर्णयाची अंमलबजावणी १ जानेवारी २०२३ पासून करण्यात येणार आहे. त्यामुळे पात्र मुख्याध्यापकांना मागील कालावधीचाही लाभ मिळणार आहे. मात्र, या रजेचे रोखीकरण करता येणार नसल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

वित्त विभागाच्या ६ डिसेंबर १९९६ रोजीच्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील पदोन्नतीप्राप्त मुख्याध्यापकांचे पद दीर्घ सुट्टीच्या काळातही कर्तव्यावर असणारे पद म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे शाळांना सुट्टी असली तरी मुख्याध्यापकांना कार्यालयीन आणि प्रशासकीय कामांसाठी उपस्थित राहावे लागते. या कामाच्या मोबदल्यात अर्जित रजा मिळावी, अशी मागणी शिक्षक संघटनांकडून सातत्याने केली जात होती.

या मागणीच्या अनुषंगाने ६ डिसेंबर २०२२ रोजी शासनाने निर्णय काढला होता. मात्र, अर्जित रजेच्या रोखीकरणाबाबत स्पष्टता नसल्याने तो निर्णय अधिक्रमित करून आता सुधारित शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (रजा) नियम, १९८१ मधील नियम ५४ (२) (ए) नुसार प्रत्येक कॅलेंडर वर्षासाठी १५ दिवसांची अर्जित रजा मंजूर करण्यात आली आहे.

Headmaster Leave Rules
Sunil Shelke News: 'कार्यक्रमाला येता येत नसेल तर राजीनामा देऊन घरी बसा'; राष्ट्रवादीच्या आमदाराचा स्वकीय नगरसेवकांना सज्जड दम

३० दिवस उपस्थितीची अट; गैरहजर राहिल्यास रजा नाही

या निर्णयानुसार मुख्याध्यापकांनी दीर्घ सुट्टीच्या कालावधीत किमान ३० दिवस कार्यालयात उपस्थित राहून काम करणे अपेक्षित आहे. मात्र, काम नसताना केवळ उपस्थिती दाखवण्यासाठी मुख्याध्यापकांना शाळेत येण्याची सक्ती करता येणार नाही. तसेच सुट्टीच्या काळात उपस्थित न राहिल्यामुळे त्यांच्या वेतनात कपातही करता येणार नाही.

सुट्टीच्या काळात ज्या दिवशी शाळेचे कार्यालयीन कामकाज केले जाईल, त्या दिवशी संबंधित मुख्याध्यापकांनी हजेरीपत्रकावर स्वाक्षरी करणे आवश्यक आहे. ३० दिवसांपेक्षा कमी उपस्थिती असल्यास उपस्थितीच्या प्रमाणात अर्जित रजा मंजूर केली जाईल. मात्र, सुट्टीच्या काळात अनुपस्थित राहिल्यास अर्जित रजा अनुज्ञेय राहणार नाही.

Headmaster Leave Rules
Satara Dcc Bank Result : भाजपला दुसरा धक्का : पाटणनंतर फलटणमध्येही पराभव, शिवसेनेच्या संजीवराजेंनी समशेरसिंह निंबाळकरांना अस्मान दाखवले

कामात हलगर्जीपणा केल्यास शिस्तभंगाची कारवाई

शाळेची महत्त्वाची आणि निकडीची कामे विहित वेळेत पूर्ण न केल्यास संबंधित मुख्याध्यापकांवर गटशिक्षणाधिकारी किंवा शिक्षणाधिकारी यांच्याकडून शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते. त्यामुळे अर्जित रजेचा लाभ मिळणार असला, तरी शाळेच्या प्रशासकीय कामकाजाची जबाबदारी वेळेत पूर्ण करणे बंधनकारक राहणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.