Sunil Shelke: 'कार्यक्रमाला येता येत नसेल तर राजीनामा देऊन घरी बसा'; राष्ट्रवादीच्या आमदाराचा स्वकीय नगरसेवकांना सज्जड दम

Maval Politics: मावळमधील नथुभाऊ भेगडे हॉलच्या लोकार्पण सोहळ्याला गैरहजर राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांवर आमदार सुनील शेळके यांनी नाराजी व्यक्त केली. कार्यक्रमाला येता येत नसेल तर राजीनामा देऊन घरी बसा, अशा शब्दांत त्यांनी सुनावले.
Sunil Shelke Warns NCP Corporators
Sunil Shelke Warns NCP CorporatorsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Maval News: जनतेने विश्वासाने निवडून दिल्यानंतरही काही नगरसेवकांना शहराच्या सार्वजनिक कार्यक्रमांसाठी वेळ देता येत नसेल, तर त्यांनी पदावर राहण्याचा विचार करावा, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार सुनील शेळके यांनी आपल्याच राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांना सुनावले.

नगरपरिषदेच्या एका महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला काही नगरसेवकांनी अनुपस्थिती दर्शवल्याने शेळके चांगलेच संतापले. यावेळी त्यांनी थेट राजीनामा देऊन घरी बसण्याचा सल्ला दिल्याने मावळच्या राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाली आहे.

मावळ शहरातील नथुभाऊ भेगडे हॉलच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले होते. शहराच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या ऐतिहासिक कार्यक्रमाला काही नगरसेवकांनी दांडी मारली. लोकप्रतिनिधींकडून अपेक्षित असलेली उपस्थिती नसल्याचे पाहून आमदार शेळके यांनी नाराजी व्यक्त केली.

Sunil Shelke Warns NCP Corporators
PAT-2 Exam 2026: दुसरी ते आठवीच्या परीक्षेच्या तारखा बदलल्या! नोव्हेंबरमध्ये होणारी PAT-2 परीक्षा आता डिसेंबरमध्ये; नवे वेळापत्रक जाहीर

'मी आणि मी' करण्यापेक्षा शहराच्या विकासाला प्राधान्य द्या!

कार्यक्रमाला गैरहजर राहिलेल्या नगरसेवकांचा समाचार घेताना शेळके यांनी स्पष्ट शब्दांत आपली भूमिका मांडली. जनतेने मोठ्या विश्वासाने निवडून दिले आहे. मात्र, नगरपरिषदेच्या कार्यक्रमापेक्षा स्वतःची वैयक्तिक कामे महत्त्वाची वाटत असतील, तर पदाचा राजीनामा देऊन घरी बसावे, अशा शब्दांत त्यांनी सुनावले.

Sunil Shelke Warns NCP Corporators
Pollution Free Diwali: उच्च न्यायालयाचा आदेश! शिक्षण विभाग अॅक्शन मोडमध्ये; दिवाळीआधी शाळांना महत्त्वाचा आदेश

राजकारणात केवळ 'मी आणि मी' करण्यापेक्षा आपापसांतील मतभेद बाजूला ठेवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. वैयक्तिक प्रतिष्ठा आणि मतभेदांमध्ये अडकून न पडता शहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे, असा सज्जड दमही त्यांनी नगरसेवकांना दिला.

स्वकीय नगरसेवकांवरच आमदारांची नाराजी

आमदार सुनील शेळके यांनी नाराजी व्यक्त केलेले नगरसेवक त्यांच्याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील असल्याने या प्रकाराची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. नथुभाऊ भेगडे हॉलच्या लोकार्पण सोहळ्यातून पक्षांतर्गत समन्वय आणि लोकप्रतिनिधींच्या जबाबदारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

आता आमदारांच्या या स्पष्ट शब्दांनंतर गैरहजर नगरसेवक काय भूमिका घेतात आणि पक्षातील समन्वयासाठी पुढे काय प्रयत्न होतात, याकडे मावळमधील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.