Ajit Pawar : धोका देना हमे आता नही और बदला लेना हम कभी भुलते नही!

shirur lok sabha constituency Amol kolhe Vs Shivajirao Adhalrao Patil : पहिल्या फेरीपासून आघाडी घेतलेल्या कोल्हेंच्या मतांची आघाडी 9 व्या फेरी अखेर कोल्हेंची आघाडी 44 हजारावर गेली.
 Amol kolhe  Ajit Pawar
Amol kolhe Ajit Pawarsarkarnama

Loksabha Election : दिल्लीच्या दिशेने शरद पवारांचे शिलेदार कूच करत आहेत. पवारांचे उमेदवार सर्वच मतदारसंघात आघाडीवर असताना शिरुरमधून त्यांच्यासाठी गूड न्यूज आहे. नवव्या फेरी अखेरी पवारांचे उमेदवार अमोल कोल्हे 44 हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर, अजित पवारांचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील पिछाडीवर आहेत. कोल्हे जिंकल्यास आढळरावांना नाही तर उपमुख्यमंत्री अजित पवारांना जबरदस्त धक्का राहणार आहे. तेव्हा डाॅ कोल्हे त्यांच्या स्टाइलमध्ये म्हणतील धोका देना हमे आता नही और बदला लेना हम कभी भुलते नही! हे नक्की

पहिल्या फेरीपासून आघाडी घेतलेल्या कोल्हेंच्या मतांची आघाडी 9 व्या फेरी अखेर कोल्हेंची आघाडी 44 हजारावर गेली. पहिल्या फेरीत कोल्हे पाच हजारांची झाली. पुढे प्रत्येक फेरीत कोल्हे पुढेच राहिले.

विशेष म्हणजे भोसरी विधानसभा मतदार संघ वगळता प्रत्येक मतदार संघात कोल्हे यांनी मतदानात आघाढी घेतल्याचे चित्र अजून शिल्लक राहिलेल्या 15 फेऱ्यांमध्ये शिवाजीराव आढळराव पाटील हे अंतर कितीने कमी करतात, याची उत्सुकता असणार आहे.

सकाळी बरोबर आठ वाजता मतमोजणी सुरु होताच पोस्टल मतांपासून कोल्हे यांनी आघाडी घ्यायला सुरुवात केली होती. ही आघाडी पहिल्या फेरीत ५ हजारांची झाली. पुढे प्रत्येक फेरीत कोल्हे पुढेच राहिले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com