Pune Metro : "मोदींच्या हाताला काय लागलं आहे?" मेट्रोचं उद्घाटन करणाऱ्यावरून 'मविआ'चा राडा, घोषणाबाजी अन्...

Mahavikas Aghadi On Pune Metro: पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रविवारी पुणे मेट्रोच्या दोन स्थानकांचं आणि काही विकासकामांचं उद्घाटन होणार आहे. पण, त्यापूर्वीच मेट्रोचं उद्घाटन करण्यावरून महाविकास आघाडीनं मोठा राडा केला आहे.
Mahavikas Aghadi Agitation
Mahavikas Aghadi AgitationSarkarnama
Published on
Updated on

Pune News: पुण्यातील जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक ते स्वारगेट मेट्रो स्थानकाचे उद्घाटन गुरूवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार होते. परंतु, हवामान विभागानं पावसाचा 'रेड' अलर्ट दिल्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी दौरा रद्द केला.

रविवारी ( 29 सप्टेंबर ) पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते स्थानकांचं उद्घाटन होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच महाविकास आघाडीच्या नेत्यांनी उद्घाटन करण्यासाठी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकाबाहेर आंदोलन केलं आहे.

यावेळी आमदार रवींद्र धंगेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, शिवसेना ( ठाकरे गट ) शहरप्रमुख संजय मोरे, काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे आणि महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानकाबाहेर भरपावसात आंदोलन केलं आहे.

'मेट्रो स्थानकाच्या उद्घाटनासाठी मुहूर्त कशाला? 'आताच मेट्रो स्थानक सुरू करा,' 'मेट्रो आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची,' असं म्हणत महाविकास आघाडीच्या आंदोलकांनी स्थानकात शिरून उद्घाटन करण्याचा प्रयत्न केला आहे.

पण, पोलिसांनी महाविकास आघाडीच्या नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना स्थानकाबाहेर रोखून धरलं आहे. यावेळी भाजप आणि महायुती सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. यावेळी पोलिस आणि पदाधिकाऱ्यांमध्ये झटापटही झाली.

Mahavikas Aghadi Agitation
Pune Metro: नवा मुहूर्त! पंतप्रधान मोदी पुणे मेट्रोचे रविवारी करणार VIDEO कॉन्फरन्सद्वारे उद्धघाटन

"पंतप्रधान मोदींनी गुरूवारी ऑनलाईन उद्घाटन का केलं नाही. 29 तारखेला कोणता मुहूर्त आहे? पुणेकरांनी केंद्रीय मंत्री दिला आहे, त्यांच्याहस्ते उद्घाटन झालं असतं, तर अपमान झाला असता का? मोदींच्या हाताला असं काय लागलं आहे? अटक करा, तुरुंगात टाका; पण मेट्रो सुरूच झाली पाहिजे. आमच्या बापाचा पैसा आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया अरविंद शिंदे यांनी दिली आहे.

Mahavikas Aghadi Agitation
Harshvardhan Patil News : नव्या आकाशी, नवी भरारी, हाती आपल्या विजयाची तुतारी; या गाण्यामुळे इंदापूरमध्ये रंगली वेगळीच चर्चा

आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले, "पंतप्रधान मोदींनी गुरूवारीच मेट्रोचं उद्घाटन करायला हवं होतं. पुणेकरांना वेठीस धरण्याचा अधिकार यांना कुणी दिला? 2016-18-22-23 आणि 2024 मध्येही मोदी पुण्यात आले होते. आरे चाललंय काय?

टप्प्याटप्प्यानं मोदी उद्घाटन करत आहेत. महाराष्ट्राच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन हा केविलवाणा प्रयत्न आहे. पंतप्रधानसारख्या उंचीच्या व्यक्तीनं कुठली उद्घाटन करावी, याची आचारसंहिता करावी लागणार आहे. नाहीतर चौक आणि रस्त्याच्या उद्घाटनासाठीही पंतप्रधान मोदी येतील."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com