Pune MLC : पार्थ पवारांच्या भेटीसाठी इच्छुकांची रांग; पुणे MLC तिकीटाचा ‘रिमोट कंट्रोल’ कुणाकडे?

Pune MLC Election 2026 : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी मिळाल्यापासून खासदार पार्थ पवार हे पक्षात अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मतदार संघातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नाव अंतिम करण्याचा अधिकार पार्थ पवार यांना देण्यात आला आहे.
Senior leaders of BJP and NCP discuss strategies for the Pune Local Authorities Constituency MLC election amid growing political competition within Mahayuti.
Pune MLC Election | BJP vs NCP Tug of WarSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 27 May : पुणे स्थानिक स्वराज संस्था मतदारसंघाच्या विधानपरिषदेच्या एका जागेवरून महायुतीमधील मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात अद्याप एकमत झालेले नाही. असे असले तरी दोन्ही पक्षांनी आपापल्या पातळीवर उमेदवारांची चाचपणी वेगाने सुरू केल्याने या जागेसाठी महायुतीत जोरदार रस्सीखेच पाहायला मिळत आहे.

याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी मागील शनिवारी पुण्यात बारामती होस्टेल येथे आजी-माजी आमदारांची बैठक घेऊन संवाद साधला आणि इच्छुक उमेदवारांची प्राथमिक चाचपणी केली. सर्व सूत्र पार्थ पवार यांनी आपल्या हातात घेतले असल्याचे सांगितले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय सरचिटणीसपदाची जबाबदारी मिळाल्यापासून खासदार पार्थ पवार हे पक्षात अनेक महत्त्वाचे निर्णय घेत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या मतदार संघातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराचे नाव अंतिम करण्याचा अधिकार पार्थ पवार यांना देण्यात आला आहे. त्यामुळे पक्षातर्फे निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आता पार्थ पवार यांची भेट घेण्यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

राष्ट्रवादीकडून 'या' नावांची चर्चा

या मतदार संघासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून अनेक बडे नेते इच्छुक आहेत. यामध्ये पुणे शहरातील माजी आमदार सुनील टिंगरे, पिंपरी-चिंचवडमधील माजी आमदार विलास लांडे, शहराध्यक्ष योगेश बहल, नगरसेवक नाना काटे, संदीप वाघेरे, तसेच ग्रामीण भागातील माजी आमदार रमेश थोरात आणि दिलीप मोहिते यांची नावे सध्या आघाडीवर आहेत.

Senior leaders of BJP and NCP discuss strategies for the Pune Local Authorities Constituency MLC election amid growing political competition within Mahayuti.
Pune BJP News: राष्ट्रवादीनं जोर लावलेली पुण्याची जागा काबीज करण्यासाठी भाजप नेत्यांनी गाठली मुंबई; फडणवीस गेम फिरवणार?

भाजपचाही जागेवर आग्रही दावा

दुसरीकडे, ही जागा पारंपरिकपणे राष्ट्रवादीची असली, तरी भाजपनेही या जागेवर आपला दावा ठोकला आहे. जिल्ह्यातील भाजप आमदारांनी या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन ही जागा भाजपकडेच राहावी, अशी आग्रही मागणी केली आहे. भाजपकडून पुणे महापालिकेतील सभागृह नेते गणेश बीडकर आणि भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांची नावे चर्चेत आहेत.

संख्याबळाचा दावा काय सांगतो?

या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे सर्वाधिक ३४४ सदस्य आहेत. त्याखालोखाल भाजपचे ३०९ आणि शिवसेना पक्षाचे ६८ सदस्य आहेत. मात्र, दौंड येथील 'नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी'चे १७ सदस्य आणि इंदापूरमधील 'कृष्णा भीमा विकास आघाडी'च्या ७ सदस्यांच्या पाठिंब्यासह आपल्याकडे एकूण ३३३ जागा असल्याचा दावा भाजपने केला आहे.

Senior leaders of BJP and NCP discuss strategies for the Pune Local Authorities Constituency MLC election amid growing political competition within Mahayuti.
Congress Politics : काँग्रेसचा मुख्यमंत्री राजीनामा देण्याच्या तयारीत! राहुल गांधींनी बैठक घेतली अन्...

प्रशासनाची तयारी पूर्ण; ८६७ मतदार करणार फैसला

दरम्यान, जिल्हा प्रशासनाकडून या निवडणुकीची तयारी पूर्ण झाली असून ८६७ मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. यामध्ये ४४१ पुरुष आणि ४२६ महिला मतदारांचा समावेश आहे. या मतदार यादीवर हरकती दाखल करण्यासाठी २९ मेपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायत आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे सदस्य या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार असून, त्यासाठी जिल्ह्यात ११ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com