BJP News : महायुती लोकसभा अन् विधानसभेपर्यंतच, यापुढे स्वबळावर! भाजपच्या 'या' नेत्याचा शिवसेना, राष्ट्रवादीवर नवा बॉम्ब

Mahayuti Politics: महायुतीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री,एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी महायुती ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपुरतीच होती, असं यापूर्वीच सांगितलं आहे. त्याचमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत शंभर टक्के सर्व जागा भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही लढणार आहोत असं आमदार जगताप म्हणाले.
Mahayuti  Government
Mahayuti Government Sarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News : विधानसभा निवडणुकीत महायुतीनं 288 पैकी 230 जागा जिंकत महाविकास आघाडीची दाणादाण उडवली.त्यात महायुतीत भाजपनं 149 पैकी तब्बल 132 जागा जिंकून युतीत आपणच मोठा भाऊ असल्याचं दाखवून दिले आहे.

या घवघवीत यशानंतर आता भाजपचा (BJP) कॉन्फिडन्स जबदस्त वाढला आहे.त्याचमुळे आता 2029 च्या विधानसभा निवडणुकीबरोबरच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतही स्वबळावर लढण्याचे संकेत भाजप नेत्यांकडून दिले जात आहेत.

भाजपनं आता मुंबईसह पुणे,पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीवर फोकस केला आहे. एकीकडे महायुती (Mahayuti) सरकारमधील पालकमंत्रीपदाचा तिढा अद्याप सुटला नसतानाच आता पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीबाबत भाजपनं आपला निर्णय फिक्स केला असल्याची चर्चा आहे. याचं कारण म्हणजे भाजप आमदार शंकर जगतापांनी आगामी निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे.

लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रितपणे लढवलेल्या भाजप-शिवसेना(एकनाथ शिंदे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस(अजित पवार) यांची महायुती आता पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत तुटण्याची शक्यता आहे. ही निवडणूक भाजप स्वबळावर लढणार आहे. याबाबतचे मोठे संकेत भाजप आमदार शंकर जगताप यांनी दिले आहेत.

Mahayuti  Government
Shahapur Crime: धक्कादायक: सरपंच देशमुख हत्येनंतर आणखी एका माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; पाय तोडले...

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत आम्ही सगळ्या जागा लढण्याची रणनीती आखल्याचे आमदार शंकर जगतापांनी स्पष्ट केले आहे. याबाबतचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच आम्हांला दिले असल्याचेही जगताप यांनी यावेळी सांगितले. त्यादृष्टीनेच आम्ही शहरात तयारीला लागलो असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.

महायुतीच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री,एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी महायुती ही लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीपुरतीच होती, असं यापूर्वीच सांगितलं आहे. त्याचमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत शंभर टक्के सर्व जागा भारतीय जनता पक्ष म्हणून आम्ही लढणार आहोत असं आमदार जगताप म्हणाले.

Mahayuti  Government
Chandrashekhar Bawankule: चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानानं राष्ट्रवादी,शिवसेनेचं टेन्शन वाढलं

आम्ही स्वबळावरती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना सामोरे जाणार आहोत. त्यांनी आपण ज्या भाजप पक्षाचं प्रतिनिधित्व करतो,त्या पक्षाचे यापूर्वीपेक्षा जास्त संख्येनं नगरसेवक यावेळी निवडून आणण्याचा आमचा मानस असल्याचेही शंकर जगताप यांनी स्पष्ट केलं आहे. जगतापांच्या या स्वबळाच्या संकेतांनंतर आता महायुतीतीस एकनाथ शिंदे शिवसेना,अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय निर्णय घेणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेलं आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे यांचे विश्वासू नेते म्हणून ओळखले जाणारे नाना काटे यांनी भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या बैठकीला हजेरी लावल्यानं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. नाना काटे हे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात आहे. त्यांनी विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून तिकीटासाठी फिल्डिंग लावली होती. पण त्यांना त्यावेळी वेटिंगवरच ठेवण्यात आले.

Mahayuti  Government
Nagpur Zilla Parishad News : काँग्रेसच्या ठरावाला भाजपचेही समर्थन; नागपूर जिल्हा परिषदेला हवी मुदतवाढ

आता त्यांनी भाजपशी जवळीक साधणं सुरू केल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे ते आगामी पिंपरी चिंचवड महाापालिका निवडणूक कमळाच्या चिन्हावर लढणार असल्याची चर्चा जोर धरू लागली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com