Nagpur Zilla Parishad News : काँग्रेसच्या ठरावाला भाजपचेही समर्थन; नागपूर जिल्हा परिषदेला हवी मुदतवाढ

Congress BJP Support News : नागपूरच्या जिल्हा परिषदेने पुढील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत आम्हाला मुदतवाढ देण्याचा ठराव गुरुवारी एकमताने पारित केला. विशेष म्हणजे सध्या महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. असे असताना मुदतवाढीसाठी भाजपच्या सदस्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.
BJP and Congress Flags
BJP and Congress FlagsSarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : जिल्हा परिषद, महापालिका तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका केव्हा होणार हे कोणालाच सध्या सांगता येत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाच्या प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी आहे. न्यायालयाच्या निकालानंतरच निवडणुका जाहीर होऊ शकतात. त्यामुळे नागपूरच्या जिल्हा परिषदेने पुढील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईपर्यंत आम्हाला मुदतवाढ देण्याचा ठराव गुरुवारी एकमताने पारित केला. विशेष म्हणजे सध्या महापालिकेत काँग्रेसची सत्ता आहे. असे असताना मुदतवाढीसाठी भाजपच्या सदस्यांनी पाठिंबा जाहीर केला आहे.

नागपूर जिल्हा परिषदेचा कार्यकाळ 17 जानेवारीला संपुष्टात येत आहे. आज गुरुवारी जिल्हा परिषदेची शेवटची सभा घेण्यात आली. या सभेतच मुदतवाढीचा प्रस्ताव शासनाला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी नागपूर जिल्हा परिषदेला अडीच वर्षे मुदतवाढ देण्यात आली होती. तेव्हा राज्यात आणि जिल्हा परिषदेत भाजपची (BJP) सत्ता होती. अडीच वर्षांचा कार्यकाळाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. न्यायालयाने ही मुदतवाढ बेकायदेशीर असल्याचा निर्वाळा दिला होता.

BJP and Congress Flags
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडची लिंक काय? यापूर्वीच्या 15 गुन्ह्यांमध्ये काय कारवाई होणार

राज्य शासनाला स्थानिक स्वराज्य संस्थांना मुदतवाढ देण्याचा अधिकार नाही तसेच कायद्यातही तरदूत नसल्याचे स्पष्ट केले आहे. यानंतरही जिल्हा परिषदेने मुदतवाढीचा प्रस्ताव पारित केला आहे. हे बघता नागपूर जिल्हा परिषदेचा ठराव राज्य शासनाच्या दरबारी संमत होण्याची शक्यता नाही. त्यामुळे 17 जानेवारीनंतर नागपूर जिल्हा परिषदेचा कारभार प्रशासकाच्या हाती जाणार आहे.

BJP and Congress Flags
Santosh Deshmukh Murder case : एसआयटीचे पथक ॲक्शन मोडवर; केजमध्ये दाखल होताच उचलले मोठे पाऊल

लोकसभेच्या निवडणुकीत रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस (Congress) महाविकास आघाडीचे श्यामकुमार बर्वे निवडून आले होते. त्यांचा सत्कार जिल्हा परिषदेच्यावतीने घेण्यात आला होता. आता नागपूरचे सुपत्र देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आहेत.

BJP and Congress Flags
Santosh Deshmukh Murder case: संतोष देशमुख यांच्या भावाने घेतली सीआयडी अधिकाऱ्यांची भेट; पथकाकडून 150 जणांची चौकशी

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य राहिलेले चंद्रशेखर बावनकुळे महसूलमंत्री तर माजी जिल्हा परिषद सदस्य आशिष जयस्वाल हे राज्याच्या मंत्रिमंडळात आहेत. या तिघांचाही सत्कार करण्याचाही ठराव जिल्हा परिषदेच्या सभेत घेण्यात आला. मुख्यमंत्र्यांची वेळ घेऊन सत्काराची तारीख जाहीर करण्यात येणार आहे.

BJP and Congress Flags
Santosh Deshmukh Murder Case : संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवी अपडेट; तपासाला येणार वेग, राज्य सरकारने उचलले मोठे पाऊल

विशेष म्हणजे ओबीसी आरक्षणामुळे नागपूर महापालिकेतही सुमारे तीन वर्षांपासून प्रशासक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जानेवारीला या प्रकरणावर अंतिम सुनावणी होण्याची शक्यता वर्तविली आहे. न्यायालयाच्या निकालानंतर लवकरात लवकर निवडणूक घेण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.

BJP and Congress Flags
Shivsena Vs BJP : भाजपमध्ये गेलेल्या नगरसेवकांच्या जागांवरही शिंदेंच्या शिवसेनेचा दावा, पुण्यात जागावाटपावरून नवा वाद?

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com