Mahayuti News: अजितदादा, पंकजा मुंडेंचा विरोध, आता भाजपच्या बड्या नेत्याचा 'बटेंगे तो कटेंगें' घोषणेला पाठिंबा; म्हणाला...

Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीतील भाजपच्या दिग्गज नेत्यांकडून प्रचारादरम्यान,'बटेंगे तो कटेंगे 'या घोषणेवर भर दिला जात आहे. पण या घोषणेचा आगामी निवडणुकीत फटका बसण्याची भीती काही नेत्यांना आहे. त्यामुळे त्यांनी उघड उघड या घोषणेला विरोध दर्शवला आहे.
Ajit pawar pankaja Munde
Ajit pawar pankaja MundeSarkarnama
Published on
Updated on

Pune News : विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी जोरदारपणे राज्यात सुरु आहे. निवडणुकीचा प्रचार संपायला अवघे 72 तास उरले आहेत. अंतिम टप्प्यातील प्रचार महायुती आणि महाविकास आघाडीसह सर्वच राजकीय पक्षांनी लावलेल्या ताकदीमुळे रंगतदार अवस्थेत पोचला आहे.

याचदरम्यान, भाजपनेही (BJP) प्रचारात कोणतीही कसर सोडलेली नाही. पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी प्रचारावेळी दिलेल्या 'बटेंगें तो कटेंगे' या घोषणेला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपच्या विधान परिषद आमदार पंकजा मुंडे यांनी जोरदार आक्षेप घेतला होता. पण आता भाजपच्या बड्या नेत्यानेच या घोषणेला आपला पाठींबा दर्शवला आहे. त्यामुळे महायुतीत बटेंगे तो कटेंगे या घोषणेवरुन जुंपल्याचे पाहायला मिळत आहे.

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे (Vinod Tawde) यांनी पुण्यात शुक्रवारी(ता.15) मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवर थेट भाष्य केलं आहे. ते म्हणाले, लोकसभेला महायुतीला जागा कमी आल्या, त्यामुळे अनेकांच्या मनामध्ये अनेक कल्पना सुरू झाल्या होत्या. पण या निवडणुकीत मत विभाजन होणार नाही. वंचित, MIM, बंडखोर यामध्ये जे मतांचं विभाजन होईल आणि भाजपला तितकंच मतदान झालं तर भाजपला तेवढ्याच जागा मिळतील असंही त्यांनी सांगितलं.

Ajit pawar pankaja Munde
J P Nadda : महाराष्ट्रात प्रचारासाठी पाऊल ठेवताच नड्डांवर गुरुद्वारातील सेवक भडकले, ठाण्यात नेमकं काय घडलं?

महायुतीतील भाजपच्या दिग्गज नेत्यांकडून प्रचारादरम्यान,'बटेंगे तो कटेंगे 'या घोषणेवर भर दिला जात आहे. पण या घोषणेचा आगामी निवडणुकीत फटका बसण्याची भीती काही नेत्यांना आहे. त्यामुळे त्यांनी उघड उघड या घोषणेला विरोध दर्शवला आहे.

यावर तावडे म्हणाले,'बटेंगे तो कटेंगे ' हे वास्तव असून त्याला माझा पाठिंबा आहे. जम्मू काश्मीर मध्ये काश्मिरी पंडित विभागले गेले आणि स्थलांतरित झाले. जाती जाती मध्ये लोक विभागले गेले की, त्याचा फायदा इतरांना होत असतो. या शब्दाचा अर्थ लोक वेगवेगळ्या पद्धतीने घेत असतात,

'राज्याला स्पष्ट बहुमताचं सरकार मिळेल,अन्...'

भाजप नेते विनोद तावडे म्हणाले, राज्यभर फिरत असताना सामान्य माणसाची भावना समजून घेतली तर या निवडणुकीत महायुती स्पष्ट बहुमताच्या पलीकडे जाईल असं चित्र दिसत आहे. 400 पार या नाऱ्यामुळे 4 टक्के मतदार होता, ज्यांनी मतदान केलं नव्हतं,पण ते यावेळी मतदान करतील. राज्याला स्पष्ट बहुमताचं सरकार मिळेल,अन् ते महायुतीचं असेल असा विश्वासही तावडेंनी यावेळी बोलून दाखवला.

Ajit pawar pankaja Munde
Sharad Pawar Vs. Raj Thackeray News : राज ठाकरेंना शरद पवारांच्या शिलेदारानं डिवचलं; खालच्या माळ्यावर कोण राहते ते माहिती आहे का ?

शरद पवारांवर मिश्किल टिप्पणी

शरद पवारसाहेबांच्या सभेचे कोण व्यक्ती नियोजन करते, उद्या कुठे पाऊस आहे हे पाहून ती व्यक्ती नियोजन करते. माननीय पवारसाहेब पावसात भिजले म्हणून ती जागा जिंकतील हा भ्रम आहे.पण साताऱ्यात लोकसभेला भाजपचा उमेदवार पराभूत झाला पण विधानसभेला जिंकला होता असा दावाही विनोद तावडे यांनी केला.

मनसेच्या जाहीरनाम्यावर भाष्य करताना राज ठाकरेंच्या पक्षाने जाहीरनामा जाहीर केला, त्यांच्या काही जागा येतीलही. पण सरकार बनवण्याएवढ्या त्यांनी जागाही उभ्या नाही केल्या असा टोलाही तावडेंनी यावेळी लगावला.

Ajit pawar pankaja Munde
MNS News Video : शिवाजी पार्कवर परवानगी मिळूनही राज ठाकरेंची सभा रद्द, दिले 'हे' कारण

'भाजपचा कुठलाच नेता स्वतःहून CM च्या शर्यतीत नसतो...'

महायुती निवडणूक एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली लढवत आहे. निवडणुकीनंतर महायुतीचा मुख्यमंत्री कोण हे एकनाथ शिंदे,देवेंद्र फडणवीस,अजित पवार आणि भाजपचे केंद्रीय नेतृत्व मिळून ठरवणार आहेत. भाजपचा कुठलाच नेता स्वतःहून शर्यतीत नसतो. केंद्रीय नेतृत्व विचार करून ठरवतील असं तावडेंनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com