Mahayuti News : शरद पवारांचा सुनील टिंगरेंना इशारा अन् फडणवीस अजितदादांमध्ये गुप्त बैठक, वडगाव शेरीचा उमेदवार बदलणार?

NCP-BJP On Vadgaon Sheri Assembly constituency : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत सुनील टिंगरे यांची गुप्त बैठक झाल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे आता हा मतदारसंघ अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून भाजपला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
Sharad Pawar, Ajit Pawar, Sunil Tingre, Devendra Fadnavis
Sharad Pawar, Ajit Pawar, Sunil Tingre, Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 03 Oct : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या जागा वाटपाची खलबत देखील अंतिम टप्प्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडे (NCP) असलेला वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ भाजपकडे जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

काही दिवसांपूर्वी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघातील भाजपमध्ये असलेले माजी आमदार बापू पठारे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारचंद्र पक्षामध्ये प्रवेश केला. या प्रवेशानंतर लगेच या मतदारसंघांमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत जाहीर मेळावा घेण्यात आला.

या मेळाव्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन केलं. याच मेळाव्यात भाषण करताना शरद पवारांनी (Sharad Pawar) पोर्शे अपघात प्रकरणावरून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार सुनील टिंगरे यांच्यावर निशाणा साधला होता. टिंगरेंचा समाचार घेत शरद पवार म्हणाले, पुण्यातील कल्याणीनगर येथील हिट अँड रन प्रकरणात अल्पवयीन चालकाला वाचवण्याचा प्रयत्न वडगाव शेरीचे आमदार सुनील टिंगरे यांनी केला.

भरधाव कारने दोन तरुणांना उडवले, त्यांचा जागच्या जागी त्यांचा मृत्यू झाला, अशा वेळेला जे जखमी झाले, त्यांना मदत करण्याऐवजी हा दिवट्या आमदार पोलिस ठाण्यात जातो आणि अल्पवयीन चालकाला वाचवतो. यासाठी मते मागितली होती का? मतं राष्ट्रवादीच्या नावाने मागितली. शरद पवारांच्या नावाने मागितली आणि लोकांनी श्रद्धेने मतदान केलं.

Sharad Pawar, Ajit Pawar, Sunil Tingre, Devendra Fadnavis
Devendra Fadnavis : पुण्यात स्कूल बसमध्ये लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमाला कोणती शिक्षा? फडणवीसांनी दोन शब्दांत सांगितले...

त्याचे उत्तरदायित्व या पद्धतीने याने केलं? चुकीच्या प्रवृत्तींना त्याने पाठिशी घातलं. त्यांना सत्तेचा माज चढला असून, त्यांचा बंदोबस्त मतदार करतील," अशा शब्दात पवारांनी टिंगरे यांच्यावर हल्लाबोल केला. शरद पवारांच्या या सभेनंतर या मतदारसंघात जोरदार चक्र फिरली. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि देवेंद्र फडणवीस यांच्या समवेत सुनील टिंगरे यांची गुप्त बैठक झाल्याचं बोललं जात आहे.

Sharad Pawar, Ajit Pawar, Sunil Tingre, Devendra Fadnavis
MVA Politics Video : महाविकास आघाडीत ठाकरेंना काँग्रेसपेक्षा कमी जागा, फाॅर्म्युला ठरला?

त्यामुळे आता हा मतदारसंघ अजित पवार गटाकडून भाजपला येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबतची चर्चा या बैठकीत झाल्याचं देखील बोलले जात आहे. त्यामुळे या मतदारसंघामध्ये पुन्हा एकदा सर्व्हे करण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सर्व्हेनंतर हा मतदारसंघ कुणाकडे राहणार हे निश्चित होणार आहे.

मात्र, तत्पूर्वी भाजपकडे येण्याची शक्यता काही टक्क्यांनी वाढल्याने भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी गेल्या काही दिवसांपासून जोरदार तयारीला लागले असून मागील दिवसांपासून वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये नाट्यमय घडामोडी घडताना दिसत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com