Devendra Fadnavis : पुण्यात स्कूल बसमध्ये लैंगिक शोषण करणाऱ्या नराधमाला कोणती शिक्षा? फडणवीसांनी दोन शब्दांत सांगितले...

Pune School Bus Girls Sexual Harassment Case : सहा वर्षांच्या दोन मुलींवर स्कूल बसमध्ये लैंगिक अत्याचार केल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे.
Devendta Fadnavis
Devendta FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : बदलापूरमधील शाळेत दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराचे प्रकरण ताजे असताना पुण्यातही अशीच घटना समोर आली आहे. यामध्ये नराधमाने सहा वर्षांच्या दोन मुलींवर स्कूल बसमध्ये अत्याचार केल्याचे समोर आले आहे. बदलापूर प्रकरणातील आरोपीचा एन्काऊंटर झाल्यानंतर आता पुण्यातील आरोपीला कोणती शिक्षा होणार, यावर फडणवीसांनी दोन शब्दांत उत्तर दिले आहे.

पुण्यातील वानवडी परिसरात 45 स्कूल बस चालकाने लैंगिक अत्याचार केले आहेत. पोलिसांनी त्याला अटक केली असून पुढील कारवाई केली जात आहे. मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. दोन्ही मुली एका नामांकित शाळेतील आहेत. त्यामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे.

Devendta Fadnavis
Pune Crime Sexual Assault Video: पुण्यात बदलापूर घटनेची पुनरावृत्ती; सहा वर्षांच्या दोन चिमुरडींवर अत्याचार, बसचालकच...

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. अतिशय वाईट पध्दतीने हे शोषण झाल्याचे फडणवीस यांनी सांगितले. स्कूल बसचा चालक फरार झाला होता, त्याला आता अटक करण्यात आली असून पोलिस पुढील कारवाई करत असल्याचे फडणवीस म्हणाले.

चालकावर कडक कारवाई पोलिसांकडून निश्चितपणे केली जाईल. कठीणात कठीण शिक्षा त्याला देण्यात येईल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. दरम्यान, बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे यांचा पोलिस व्हॅनमध्ये एन्काऊंटर करण्यात आला आहे. त्याने पोलिसांवर गोळीबार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर बचावासाठी करण्यात आलेल्या गोळीबारात त्याचा मृत्यू झालाचा दावा पोलिसांकडून केला जात आहे.

Devendta Fadnavis
Manoj Jarange Patil Video : "आरक्षण दिल्याशिवाय फडणवीस आचारसंहिता लावणार नाहीत..."; जरांगेंना विश्वास, नेमकं काय म्हणाले?

अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरनंतर ठाण्यासह काही भागात फटाके फोडण्यात आले होते. विरोधकांकडून मात्र हा फेक एन्काऊंटर असल्याचे आरोप केले जात आहेत. तर फडणवीसांसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांच्या दुटप्पी भूमिकेवर निशाणा साधला होता. आता पुण्यातील प्रकरणानंतर त्यावरूनही राजकारण तापले असून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल चढवला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com