Malegaon Election Result : अजितदादांची कट्टर विरोधकांसोबत हातमिळवणी; पहिल्याच निवडणुकीत अपक्षांनी दिली जोरदार टक्कर

Ajit Pawar NCP victory : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आठ उमेदवार नगरसेवक पदासाठी विजयी झाले आहेत. तर नगराध्यक्षपदाचे सुयोग सातपुते हे 11 हजार मतांनी आघाडी घेऊन विजयी झाले आहेत.
Malegaon Nagarpanchayat Election
Malegaon Nagarpanchayat ElectionSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra local body elections : बारामती तालुक्यातील माळेगाव बु. नगरपंचायतीच्या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने कट्टर विरोधकांसोबत आघाडी करत सर्वांनाच धक्का दिला होता. त्यातच माळेगाव नगरपंचायतीची ही पहिलीच निवडणूक असल्याने सर्वांच्या नजरा निकालाकडे खिळल्या होत्या.

काही महिन्यांपूर्वीच माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक झाली होती. या निवडणुकीत अजित पवारांनी स्वत: उतरत पक्षाला दणदणीत विजय मिळवून दिला होता. त्यांच्यासमोर कट्टर प्रतिस्पर्धी चंद्रकांत तावरे व रंजन तावरे यांचे आव्हान होते. या निवडणुकीनंतर नगरंपचायतीच्या निवडणुकीतही कट्टर विरोधक पुन्हा आमनेसामने असतील अशी चर्चा होती.

अजित पवारांनी मात्र निवडणुकीआधी रंजन तावरे यांच्या जनमत विकास आघाडीसोबत युती केली आणि ही निवडणूक एकहाती जिंकण्यासाठी पहिला डाव टाकला. त्यामध्ये त्यांना यश आले असून या युतीची माळेगावमध्ये सत्ता आली आहे. मात्र, कट्टर विरोधकांना सोबत घेऊनही अजितदादांच्या उमेदवारांना अपक्षांनी जोरदार टक्कर दिल्याचे निकालातून स्पष्ट झाले आहे.

Malegaon Nagarpanchayat Election
Bhor Election Result : संग्राम थोपटेंना धक्का; मुख्यमंत्र्यांना निवडणूक रिंगणात उतरूनही अजितदादांच्या आमदारांनी मारली बाजी

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आठ उमेदवार नगरसेवक पदासाठी विजयी झाले आहेत. तर नगराध्यक्षपदाचे सुयोग सातपुते हे 11 हजार मतांनी आघाडी घेऊन विजयी झाले आहेत. जनमत विकास आघाडीचे प्रमुख रंजन तावरे यांच्या वाट्याला आलेल्या पाच जागांपैकी तीन जागा विजयी झाले आहेत. याशिवाय भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत पुरस्कृत एक जागा प्रमोद तावरे यांच्या माध्यमातून विजयी झाले आहे.

Malegaon Nagarpanchayat Election
Ausa Nagar Parishad election Result : CM फडणवीसांच्या मर्जीतील आमदाराला मोठा धक्का; राष्ट्रवादीने चारली धूळ...

निवडणुकीमध्ये अपक्षांनी पाच जागांवर विजय मिळवून आपली ताकद दाखवून दिली आहे. अपक्ष उमेदवारांचे गटनेते दीपक तावरे यांचे हे यश असल्याचे मानले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात शरद पवार यांच्या राष्ट्रवादीसह इतर स्थानिक नेत्यांनी एकत्रित येत ताकद लावली होती. अजितदादांचे सर्व जागा जिंकण्याचे मनुसबे त्यांनी उधळून लावले आहेत.   

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com