
माळेगाव सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज मतदान झाले. राज्याचे लक्ष लागलेल्या या निवडणुकीत माळेगावच्या बहुतांश उमेदवारांनी मते विकत घेण्यासाठी वारेमाप पैशांचे वाटप केल्याची चर्चा कार्यक्षेत्रात होती. मताला १० हजार रुपयांचा भाव फुटला होता. त्यासाठी ५० रुपयांचे टोकन देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. 'क्रॉस व्होटिंग'झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे भल्या भल्या उमेदवारांचे धाबे दणाणले आहे. असे असले तरी तिन्ही पॅनेलने विजयाचा दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुरस्कृत सत्ताधारी निलकंठेश्वर पॅनेल विरुद्ध सहकार बचाव शेतकरी पॅनेल यांच्यामध्ये लढत आहे. दोन्ही बाजूंच्या उमेदवारांसाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. ऐनवेळी दगाफटका होऊ नये, यासाठी दोन्ही गटांच्या नेत्यांनी काळजी घेतली होती. आपल्याच कार्यकर्ता अथवा गावपुढाऱ्यांकडून गद्दारी होणार नाही, याकडेही बारकाईने लक्ष ठेवले होते. निळकंठेश्वर पॅनेलच्या पदाधिकार्यांच्या कामगिरीवर खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे लक्ष होते.
कारखाना डोळ्यासमोर ठेवून मतदान करा, असे आव्हान सहकार बचाव शेतकरी पॅनेलचे प्रमुख चंद्रराव तावरे, रंजन तावरे, अॅड. जी.बी गावडे, युवराज तावरे, अॅड. शाम कोकरे आदींनी मतदारांना केले होते. ष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाने बळीराजा पॅनेलचे उमेदवारांनी ताकद लावली आहे. खासदार सुप्रिया सुळे यानी सकाळच्या वेळी माळेगाव येथील मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावला. बळीराजा पॅनेलचे पदाधिकारी आपले स्वतंत्र अस्तित्व किती मजबूत आहे, हे दाखविण्यासाठी प्रयत्न करीत होते. कष्ठकरी शेतकरी पॅनेलचे उमेदवार अधिकाधिक मतदान करून घेत होते.
अशातच क्रॉस व्होटिंग झाल्याची चर्चा आहे. "काही प्रमाणात क्रॉस व्होटिंग झाले. पण त्याचे प्रमाण मर्यादित आहे. अनेक सभासदांनी 'पॅनेल टू पॅनेल' मतदान करण्यावर भर दिला. त्यात राष्ट्रवादीच्या विचारांच्या मतदारांचा अधिकचा समावेश आहे. अजित पवारांचे कट्टर विरोधक रंजन तावरे यांनी मनुष्यरूपी पांडुरंगाने दिलेला कौल आम्ही मान्य करणार आहे," असे सत्ताधारी गटाचे उमेदवार बाळासाहेब तावरे म्हणाले.
माळेगाव गटासह ६ गटामध्ये कार्यकर्ते, पदाधिकारी व उमेदवार अजित पवार यांच्या सूचनेनुसार 'पॅनेल टू पॅनेल' मतदान करून घेण्यास आग्रही होते. त्यामध्ये राजवर्धन शिंदे, बाळासाहेब तावरे, अॅड.केशवराव जगताप, संभाजी होळकर, विश्वासराव देवकाते, मदनराव देवकाते, रामदास आटोळे आदींचा समावेश होता. त्याच पद्धतीने विरोधी सहकार बचाव शेतकरी पॅनेलच्या गोटातही मतदानाच्या दिवशी एकजूट दिसून आली. त्या पॅनेलचे प्रमुख ज्येष्ठ नेते चंद्रराव तावरे, रंजन तावरे हे आपल्या सर्व उमेदवारांना अधिकाधिक मतदान होण्यासाठी खूप मेहनत घेताना दिसले. त्यामुळे कोण पहिल्या, कोण दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांवर फेकले गेले, अशी जोरदार चर्चा दिवसभर ऐकायला मिळाली.
'माळेगाव'च्या कार्य क्षेत्रातील ६७ मतदान केंद्रांवरील काही ठिकाणी रांगा, तर काही ठिकाणी गर्दी पाहावयास मिळाली. बारामती, सांगवी, माळेगाव, पणदरे, खांडज-शिरवली आणि नीरावागज असा गट निहाय मतदानाचा आढावा घेताना सर्वत्र तुरशीचे मतदान झाले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.