Malegaon Election: 'माळेगाव'मध्ये पराभवाचा धक्का सहन केलेल्या तावरेंची मोठी घोषणा; म्हणाले, 'अजित पवार यांच्याविरुद्ध...'

Chandrarao Tawre Vs Ajit Pawar : माळेगाव (ता.बारामती) सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत निळकंठेश्वर पॅनेल विजयी झाला. त्याउलट विरोधक चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनेल पराभूत झाला.
Malegaon Sugar Factory Election Result 2025
Malegaon Sugar Factory Election Result 2025sarkarnama
Published on
Updated on

Malegaon News : महाराष्ट्रात ऊस दराची स्पर्धा कायम रहावी. यासाठी सहकार क्षेत्रातील माळेगाव साखर कारखाना विरोधकांच्या ताब्यात असावा, अशी मनोमन इच्छा बहुमतांशी शेतकऱ्यांची होती. परंतु पैसे घेवून लाचार झालेल्या काही सभासदांनी चुकीचा निर्णय घेतला आणि आमचा पराभव झाला. सात हजारपेक्षा अधिक प्रमाणिक सभासदांनी या निवडणुकीत आम्हाला पाठिंबा दिला.

त्या पाठिंब्याच्या जोरावर यापुढेही सभासदांच्या भल्यासाठी लढत राहणार आहे. खासगी कारखान्यांच्या तुलनेत माळेगावचे विस्तारिकरण करून अधिकाधिक ऊस गाळपासाठी आमचा आग्रह धरणार आहे. सर्वाधिक ऊस दराची परंपरा कायम ठेवण्यासाठी माळेगावचे अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याविरूद्ध रस्त्यावर उतरणार आहे, असा इशारा विरोधक चंद्रराव तावरे यांनी दिला.

माळेगाव (ता.बारामती) सहकारी साखर कारखाना पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. या निवडणुकीत निळकंठेश्वर पॅनेल विजयी झाला. त्याउलट विरोधक चंद्रराव तावरे, रंजन तावरे यांचा सहकार बचाव शेतकरी पॅनेल पराभूत झाला. परंतु, पराभूत होत असतानाही सुमारे सात हजारपेक्षा अधिक मतदारांनी विरोधी पॅनेलला मतदान केले व स्वाभिमान जागृत ठेवला. त्या पार्श्वभूमीवर सहकार बचाव पॅनेलची सांगवी येथे आभार सभा झाली. त्यावेळी चंद्रराव तावरे बोलत होते.

ते म्हणाले,माळेगाव (Malegaon Sugar Factory Election) सध्याला साडेसात ते आठ हजार टन क्षमतेने प्रतिदिनी ऊसाचे गाळप करतो. परंतु शेजारचे व खाजगी कारखाने कमी कालावधीत अधिक गाळप करतात. त्यामध्ये बारामती अॅग्रो, दौंड शुगर, आंबालिका आदी खासगी कारखाने सुमारे 20 हजार टनापेक्षा अधिक गाळप करतात. त्यांची डिस्टलरी मोठी आहे. तशीच परिस्थिती शेजारच्या फलटण तालुक्यात आहे. त्यामुळे यापुढील काळात माळेगाव ऊस दाराच्या स्पर्धेत टिकण्यासाठी या कारखान्याचे विस्तारणीकरण झाले पाहिजे.

Malegaon Sugar Factory Election Result 2025
Kolhapur News: कोल्हापूर महापालिकेत काँग्रेस दुबळा नाही; महायुतीसाठी सतेज पाटील डोकेदुखी ठरणार

नवीन चेअरमन (अजित पवार) यांनी केवळ रस्ते बांधून आणि इमारतींना रंगरंगोटी करू नये. धोरणात्मक निर्णय घेऊन माळेगावचे विस्तारिकरण करावे, डिस्टलरी मोठी करावी आणि सभासदांना अधिकचे दोन पैसे द्यावे. तसे न केल्यास त्यांच्याविरूद्ध संघर्षासाठी आम्ही तयारी ठेवली आहे.``

माळेगावची निवडणूक सत्तेचा गैरवापर करून जिंकली आहे, असे सांगत रंजन तावरे म्हणाले,`` माळेगावचा विजय अजित पवारांना मिळावा यासाठी खासदार सुप्रिया सुळे, युगेंद्र पवार (नाव न घेता) यांनी तिसरे पॅनेल तयार केले. वास्तविक हे सर्व पवार एकच आहेत. त्यांच्यामध्ये कोणतेही मतभेद नाहीत, हे माळेगावच्या निवडणुकीत स्पष्ट झाले.

Malegaon Sugar Factory Election Result 2025
Indapur Politic's : हर्षवर्धन पाटील यांच्या भाजप प्रवेशाबाबत जिल्हाध्यक्षांचे मोठे विधान; इंदापुरात ऑगस्टमध्ये होणार मोठी घोषणा

खासगी कारखान्यांना अधिकचा ऊस दरासाठी माळेगाव कारखाना अडथळा ठरत होता. तो अडथळा दूर करण्यासाठी घरचा कारखाना सोडून अजित पवार माळेगाव घेण्यासाठी आले. परंतु त्यांचा मनसुबा आम्ही कदापि यशस्वी होऊ देणार नाही.

चिन्ह वाटप, मतदान प्रक्रिया ते मतमोजणी निकालापर्यंत अजित पवार यांनी प्रचंड पैशाचा आणि सत्तेचा दुरोपयोग केला. एक दिवस हाच पैसाच त्यांचा घात केल्याशिवाय राहणार नाही. `` तत्पूर्वी अॅड.जी.बी.गावडे, युवराज तावरे यांनी पवार दिलेला शब्द फिरविण्यात तरबेज आहेत. लोकसभा, विधानसभेच्यावेळी ठरले तसे वागले नाहीत, असाही आरोप त्यांनी केला. यावेळी रोहन कोकरे, विठ्ठल देवकाते, सतिश घाडगे, शिवाजी गावडे, धनंजय गवारे, राजेश देवकाते, रोहित जगताप, अॅड. शाम कोकरे यांनी सत्ताधाऱ्यांना टिकेचे लक्ष केले.

Malegaon Sugar Factory Election Result 2025
Vasant More: ठाकरे बंधू एकत्र आले पण ट्रोलर्सच्या निशाण्यावर वसंत मोरे सापडले! 'त्या' फोटोची पुन्हा सुरु झाली चर्चा

माळेगावच्या सभासदांना वाऱ्यावर सोडणार नाही, संचालक मंडळाच्या प्रत्येक मिटींगला हजार राहणार, खासगी कारखान्यांच्या तुलनेत माळेगावच्या विस्तारणीकरणासाठी अध्यक्षांना पत्र देणार, 5 लाख लिटरचा इथेनाॅल प्रकल्पासाठी आग्रह धरणार, ऊसदराची स्पर्धा कायम ठेण्यास सत्ताधाऱ्यांना भाग पाडणार, मंत्रिमंडळातील मंत्री खासदार, आमदार, नगरसेवकांपासून सर्वांची ताकद सहकारी कारखाना संपविण्यासाठी लागली. अर्थिकदृष्ट्या अडचणीतून माळेगाव कारखाना बाहेर काढण्यासाठी 85 व्या वर्षी सभासदांच्या आग्रहास्तव निवडणूक लढवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com