Kokate rummy game: कोकाटेंचा रमीचा डाव देशभर गाजला... संसदेत सगळ्याच राज्यातील खासदार थांबवून थांबवून विचारतात..

Parliament MP rummy curiosity News : महाराष्ट्रात याबाबत चर्चा सुरू असताना केंद्रातील खासदारांना देखील याबाबत मोठ्या प्रमाणात उत्सुकता असून ते महाराष्ट्रातील खासदारांना याबाबत विचारत आहेत.
Maanikrao-Kokate-Rummy-Controversy
Maanikrao-Kokate-Rummy-ControversySarkarnama
Published on
Updated on

Pune News : कृषिमंत्री माणिकराव कोकाटे सभागृह सुरू असताना रमी खेळत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्याबाबतचा व्हिडिओ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला होता. या प्रकरणाची सध्या महाराष्ट्रात जोरदार चर्चा आहेत. महाराष्ट्रात याबाबत चर्चा सुरू असताना केंद्रातील खासदारांना देखील याबाबत मोठ्या प्रमाणात उत्सुकता असून ते महाराष्ट्रातील खासदारांना याबाबत विचारत असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

पुण्यातील माध्यमाशी बोलताना सुप्रिया सुळे (Supriya sule) म्हणाल्या, 'दिल्लीमध्ये महाराष्ट्रबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरू आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील तीन दिवस दिल्लीत होते. मंत्रिमंडळाच्या मंत्र्यांकडून जे सुरू आहे त्यावर मुख्यमंत्री प्रचंड नाराज असल्याचे समोर येत आहे.

Maanikrao-Kokate-Rummy-Controversy
Sharad Sonawane : शिवसेना प्रवेशाचा निर्णय अंगलट; जुन्नरचे आमदार शरद सोनवणेंना पक्षांतर बंदीची नोटीस

मित्रपक्षांवर मुख्यमंत्री फडणवीस (Devendra fadnavis) नाराज आहेत, हे विविध माध्यमातून समोर येत आहे. महाराष्ट्रातील मित्र पक्षांचे आणि सरकारमध्ये ज्या गोष्टी सुरू आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची प्रतिमा वाईट होईल, अशी परिस्थिती सध्या आहे. मी दिल्लीमध्ये असताना प्रत्येक राज्याचे खासदार मला थांबून थांबून विचारत होती की रम्मीचा काय प्रकार सुरू आहे, अशी विचारणा केली जात होती, असेही त्यांनी सांगितले.

Maanikrao-Kokate-Rummy-Controversy
BJP ShivSena NCP alliance : बहुमतासाठी फक्त आठ आमदार कमी... तरी शिवसेना-राष्ट्रवादीचं ओझं भाजप का वागवतीय? फडणवीस यांची मजबुरी तरी काय?

कोण आहेत हे मंत्री जे सभागृहामध्ये रमी खेळत आहेत. काही दिवसापूर्वी मंत्र्यांकडे जी बॅगमध्ये कॅश दिसते ती कोणाची आहे. अशा प्रकारचे अनेक प्रश्न महाराष्ट्र बाहेरचे खासदार मला सातत्याने विचारत असतात, असेही सुप्रिया सुळे यांनी यावेळी सांगितले.

Maanikrao-Kokate-Rummy-Controversy
Mahayuti Politics : शिंदेंच्या नेत्याला फडणवीसांनी डावललं, मंत्रिपद जाणार? नाराज शिरसाटांना माधुरी मिसाळांनी दिलेल्या 'त्या' उत्तरामुळे चर्चांना उधाण

राज्यात कुठलीही घटना घडली की, देशभर जाते. त्यामुळे राज्याची देशभरात प्रचंड बिकट अवस्था झाली आहे. सांगलीमध्ये कॉन्ट्रॅक्टरने केलेल्या आत्महत्याबाबत देखील लोकांनी विचारलं खरंच महाराष्ट्र दिवाळीखोरीच्या वाटेवरती आलाय का? असा प्रश्न त्यांना पडला आहे. कारण राज्याच्या आर्थिक परिस्थिती बाबतचे रिपोर्ट त्यांना मिळत असतात, असे सुप्रिया सुळे म्हणल्या.

Maanikrao-Kokate-Rummy-Controversy
NCP vs BJP News : अजितदादांच्या मंत्र्यांचं घर फुटलं : सख्खा भाऊ भाजपमध्ये, 8 महिन्यांचे प्रयत्न यशस्वी

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com