Manoj Jarange Mumbai Morcha : वाट पाहत असलेल्या कुटुंबाला भेटून जरांगे भावूक, मुलगीही गळ्यात पडून रडली

Manoj Jarange Patil Protest Mumbai : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे-पाटील मुंबईच्या दिशेने निघाले...
Manoj Jarange-Patil
Manoj Jarange-PatilSarkarnama
Published on
Updated on

Manoj Jarange Patil March to Mumbai :

दिलीप दखणे -

मराठा आरक्षणासाठी आरपारची लढाई करीत मनोज जरांगे-पाटील हजारो, लाखोंच्या मराठा समाजासह आज अंतरवाली येथून मुंबईकडे रवाना झाले. अंतरवाली ते गेवराईदरम्यान शहागड येथे Manoj Jarange-Patil यांची मुलगी, मुलगा आणि पत्नी वाट पाहत उभे होते. शहागडहूून पुढे निघताना जरांगे यांनी कुटुंबाची भेट घेतली.

Manoj Jarange-Patil
Manoj Jarange And Bacchu Kadu : आधी सरकारकडून शिष्टाई, आता थेट आंदोलनातच उडी; बच्चू कडूंची भूमिका काय?

यावेळी त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले, तर मुलीने आपल्या लाडक्या पप्पांच्या गळ्यात पडत त्यांच्या या लढ्याला आमची खंबीर साथ असल्याचे दाखवून दिले. (Maratha Reservation) मुलगाही भावूक झाला, परंतु त्याने वडिलांना धीरोदात्तपणे साथ देत सरकारला इशाराही दिला. वडीगोद्री शहागड रोडवर मनोज जरांगे व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची भेट झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पत्नी सुमित्रा जरांगे, मुलगा शिवराज, मुलगी पल्लवी जरांगे यांची भेट झाली. वडिलांच्या जीविताला काही झालं तर सरकारला सोडणार नाही, असा इशाराही मुलगी पल्लवी हिने यावेळी दिला. (Maratha Reservation Mumbai Protest) सात महिन्यांत मुंबईला जात असताना कुटुंबातील सदस्यांशी जरांगे यांची आज भेट झाली. हा भावनिक प्रसंग पाहून उपस्थितांचे डोळेही पाणावले होते.

edited by sachin fulpagare

R...

Manoj Jarange-Patil
Manoj Jarange Mumbai Morcha : जरांगेंची मुंबईच्या दिशेन कूच; असा असेल अंतरवालीपासूनचा मार्ग...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com