मराठा आरक्षणाचा लढा आता अंतिम टप्प्यात आला आहे. आता नाही तर कधीच नाही.. लढेंगे जितेंगे.. हम सब जरांगे आणि आरक्षण आमच्या हक्काचे..! अशा उस्फुर्त घोषणा देत सकल मराठा समाजाची पदयात्रा मुंबईकडे मार्गस्थ झाली आहे. मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वात 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून निघालेला ही पदयात्रा बुधवारी लोणावळ्यात मुक्कामी आहे. या ठिकाणी जरांगे-पाटलांची तोफ धडाडणार असून ते काय बोलणार याकडे सगळ्याचे लक्ष असणार आहे.
मराठा आरक्षणासाठी (Maratha Reservation) राज्यभरातून मराठा समाज जरांगे-पाटलांना (Manoj Jarange Patil) पाठिंबा देण्यासाठी रस्त्यावर उतरला आहे. मुंबईला पोहोचण्यापूर्वीच पुण्यात घोंगावलेल्या मराठा समाजाच्या वादळाने सरकारच्या उरात धडकी भरवली आहे. आरक्षणाच्या लढ्यात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून लाखोंच्या संख्येने मराठा बांधव जरांगे-पाटलांच्या पदयात्रेत दाखल झाले आहेत. दोन दिवस पुण्यात भगव्या ज्वाला उसळल्यानंतर बुधवारी हा मोर्चा लोणावळ्याकडे मार्गस्थ झाला.
मुंबईकडे (Mumbai) कुच करणारा हा झंझावात बुधवारी लोणावळा शहराजवळील वाकसई चाळ या ठिकाणी मुक्काम करणार आहे. त्या पार्श्वभूमीवर लोणावळा आणि परिसरातील समस्त मराठा समाज समाजाकडून त्यांच्या मुक्कामाची आणि जाहीर सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे.
लोणावळ्यात 130 एकराचे मैदानावर जरांगे-पाटलांची हीर सभा होणार आहे. यासाठी लोणावळा शहर आणि ग्रामीण भागातील सकल मराठा समाजाच्या वतीने पार्किग, विसाव्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था या सर्व गोष्टींचे चोख नियोजन करण्यात आले आहे.
जरांगे-पाटलांसोबत सहभागी झालेल्या हजारो मराठा बांधवांच्या जेवणाची सोय लोणावळ्यातील सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी घराघरातून 25 चपात्या, चटणी, भाजीचा पुरवठा केला जाणार आहे. यामध्ये स्थानिक मराठा महिलांनी उस्फुर्तपणे सहभाग नोंदवला आहे. तसेच मोर्चात सहभागी झालेल्या स्वयंस्वेकांकडूनही स्थानिकांना आजची सभा आणि भोजन व्यवस्था सुरळीत पार पडण्यासाठ मदत केली जात आहे.
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात राज्यभरात आंदोलन करण्यात आली. अंतरवाली सराटी हे आंदोलनाचे केंद्रबिंदू ठरले. मराठ्याचा मोर्चा आता पुणे ओलांडून सह्याद्रीच्या कुशीत दाखल झाला आहे. मात्र सरकारकडून मराठा आरक्षणावर वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप जरांगे-पाटलांकडून होत आहे. त्यामुळे लोणावळ्यातील सभेत जरांगे-पाटील सरकारवर किती बोचरी टीका करणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.
(Edited by Avinash Chandane)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.