Manoj Jarange Patil : आधी शरद पवारांच्या पक्षाकडून इच्छुक, आता जरांगे पाटलांच्या आदेशानं भरला उमेदवारी अर्ज

Pune Assembly Election 2024 : पर्वती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अश्विनी कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघातून सचिन तावरे देखील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patil Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : आगामी विधानसभा निवडणुकीत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी ज्या ठिकाणी उमेदवार निवडून येण्याची शक्यता आहे. त्या ठिकाणी उमेदवार देण्याचे निश्चित केले आहे. त्याबाबतचा अंतिम निर्णय ते 30 तारखेला घेणार आहे.

Summary

त्यापूर्वी अनेक मतदारसंघांमध्ये उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा संदेश मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला असल्याचं बोललं जात आहे. त्यानुसार पर्वती विधानसभा मतदारसंघातून सचिन तावरे यांनी आपल्याला जरांगे यांनी अर्ज भरण्यास सांगितले असल्याचा दावा करत अपक्ष अर्ज दाखल केला आहे.

पर्वती विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने अश्विनी कदम यांना उमेदवारी जाहीर केली आहे. या मतदारसंघातून सचिन तावरे देखील राष्ट्रवादी काँग्रेस(NCP) शरदचंद्र पवार पक्षाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. त्यांना पक्षाची उमेदवारी न मिळाल्याने आता त्यांनी मराठा समाजाच्या वतीने अर्ज भरला असल्याचे बोलले जात आहे.

Manoj Jarange Patil
Kolhapur Congress : काँग्रेसवर नामुष्की अन् सतेज पाटलांना धक्का; एकहाती नेतृत्वाची सत्वपरीक्षा...

उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आजच्या शेवटच्या दिवशी सचिन तावरे यांनी हातात संविधान घेत आणि 'एक मराठा लाख मराठा'च्या घोषणा देत शक्तिप्रदर्शन करत अर्ज दाखल केला आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघात 1 लाख 30 हजार मराठा समाज समाजाची मत असल्याचं सांगण्यात येत आहे.

जरांगे पाटील यांनी 30 तारखेला विधानसभा निवडणुकीबाबत निर्णय घेतल्यानंतर पर्वती विधानसभा मतदारसंघात ते दोन सभा घेणार असल्याचा देखील तावरे यांच्याकडून सांगण्यात आला आहे.

Manoj Jarange Patil
Baramati Politics VIDEO: घर कुणी फोडलं? दादांच्या प्रश्नावर साहेबांनी सगळंच सांगितलं! सर्व भाऊ माझे आधार...

उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर माध्यमांशी बोलताना तावरे म्हणाले, मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशानेच आज फॉर्म भरला आहे. विधानसभा निवडणुकीबाबत जरांगे पाटील उद्या निर्णय घेणार आहेत.

मात्र, त्यापूर्वी ज्या ज्या ठिकाणी निवडून येण्याची जास्त शक्यता आहे. त्या ठिकाणी उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास सांगितले असल्याचा तावरे यांनी सांगितले. 30 तारखेला निर्णय झाल्यानंतर पर्वती विधानसभा मतदारसंघात दोन ठिकाणी जरांगे पाटील सभा घेतील असा विश्वास तावरे यांनी व्यक्त केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com