Manorama Khedkar : मनोरमा खेडकरांना कारणे दाखवा नोटीस; ‘तुमचा शस्त्र परवाना रद्द का करू नये?’, पुणे पोलिसांचा सवाल

Pune Crime News : जमिनीचा ताबा घेताना मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यावर पिस्तूल रोखल्याप्रकरणी हा गुन्हा आहे.
Manorama Khedkar
Manorama KhedkarSarkarnama
Published on
Updated on

Pune, 14 July : वादग्रस्त प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरणात रोज नवनवीन ट्विस्ट येताना पाहायला मिळत आहेत. पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्याविरोधात पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जमिनीचा ताबा घेताना मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यावर पिस्तूल रोखल्याप्रकरणी हा गुन्हा आहे. पुराव्याच्या आधारे पुणे पोलिसांनी मनोरमा खेडकर यांना तुमचा शस्त्र परवाना का रद्द करण्यात येऊ नये, अशी कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे.

पुणे (Pune) जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम जिल्ह्यात प्रशिक्षणासाठी बदली करण्यात आलेल्या प्रोबेशनरी आयएएस अधिकारी पूजा खेडकर (Pooja Khedkar) गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांनी केलेल्या 'कारनाम्या'मुळे त्या सध्या जोरदार चर्चेत आहेत. आपल्या खासगी ऑडी कारवर त्यांनी अंबर दिवा लावला होता.

जिल्हाधिकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर ताब्यात घेत त्यांचे सामान बाहेर काढले होते. आयएएस अधिकारी असतानाही त्या दर्जाच्या सोयी सुविधा मिळत नसल्याने खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना कडक शब्दांत समज दिली होती. त्यांच्याकडून होत असलेल्या त्रासाची माहिती अधिकारी, कर्मचारी यांनी जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांच्याकडे केली होती. हे प्रकरण वरिष्ठ पातळीवर पोहोचल्यानंतर राज्य सरकारकडून त्यांची वाशीम येथे बदली करण्यात आली.

खेडकर यांचे प्रकरण समोर आल्यानंतर या प्रकरणांमध्ये वेगवेगळे खुलासे आतापर्यंत समोर आले आहेत. दरम्यानच्या कालावधीत पूजा खेडकर यांच्या आई-वडिलांवरही गुन्हा दाखल झाला आहे. पौड पोलिस ठाण्यात पूजा खेडकर यांचे वडील दिलीप खेडकर आणि मनोरमा खेडकर (Manorama Khedkar) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुळशी तालुक्यातील धडवली गावात खेडकर कुटुंबानं 25 एकर जमीन खरेदी केली होती. ती ताब्यात घेताना शेजारील शेतकऱ्यांच्या जमीन ताब्यात घेण्याचा प्रयत्न मनोरमा खेडकर यांनी केला होता. त्याला संबंधित शेतकऱ्यांना विरोध केला, तेव्हा मनोरमा खेडकर या 'बाउन्सर' घेऊन तिथे पोहोचल्या होत्या.

Manorama Khedkar
Dhairyasheel Mohite Patil : जयंत पाटलांचा पराभव राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा ठरेल; धैर्यशील मोहिते पाटील यांचे भाकीत

मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकाविले. याबाबत संबंधित शेतकऱ्यांनी पौड पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. पण, त्यावेळी पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतली नाही. त्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर शुक्रवारी संध्यकाळी पौड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पंढरीनाथ कोंडिबा पासलकर (वय 65 वर्षे. रा. केडगाव (आंबेगाव पुनवर्सन) ता. दौड, जि. पुणे यांनी ही तक्रार दिली आहे.

याच गुन्ह्याच्या आधारे आता पोलिसांनी नोटीस पाठवली आहे. नोटिशीत नमूद करण्यात आले आहे की, तुम्हास अग्नी शस्त्र परवाना स्वसंरक्षणासाठी मंजूर झालेला असतानाही तुम्ही त्या शस्त्राचा दुरुपयोग करुन गुन्हेगारी कृत्य केले, त्यामुळे तुमच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. तुमच्या या बेजबाबदार कृत्यामुळे कुटुंबातील व्यक्ती तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तुम्ही शस्त्राचा दुरुपयोग करुन परवानाविषयक अटी व शर्तीचा भंग केला आहे, त्यामुळे तुम्ही शस्त्र परवाना धारण करण्यास योग्य व्यक्ती नाही आहात, अशी खात्री झाल्याने तुम्हास ही कारणे दाखवा नोटीस देण्यात येत आहे.

ही कारणे दाखवा नोटीस प्राप्त झाल्यापासून 10 दिवसांच्या आत तुमचे समर्थनीय उत्तर या कार्यालयास लेखी स्वरुपात सादर करावे. मुदतीत तुमचे उत्तर प्राप्त न झाल्यास सदर कारवाई तुम्हास मान्य आहे. असे गृहीत धरुन तुमचा शस्त्र परवाना रद्द करण्याबाबत पुढील कारवाई करण्यात येईल, याची नोंद घ्यावी, असे या नोटिशीमध्ये नमूद करण्यात आले आहे. नोटिशीवर पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची स्वाक्षरी आहे.

Manorama Khedkar
Amravati DPC Fund : चंद्रकांतदादांना वेळ मिळेना, 158 कोटींचा निधी माघारी जाण्याची भीती; बच्चू कडूंची पाटलांवर टीका

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com