Manorama Khedkar : 'छे छे अपहरण नाही हो, तो तर पाहुणचार', मनोरमा खेडकरांचा कोर्टात धक्कादायक दावा

Manorama Khedkar court statement : माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना आज कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. ट्रक क्लिनर अपहरण प्रकरणात नवी मुंबई पोलिस अनेक दिवसांपासून यांच्या शोधात आहेत.
Manorama Khedkar
Manorama Khedkar Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : माजी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना आज कोर्टात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता. ट्रक क्लिनर अपहरण प्रकरणात नवी मुंबई पोलिस अनेक दिवसांपासून यांच्या शोधात आहेत. मात्र त्या पोलिसांना गुंगारा देत पसार झाले आहेत. अशातच आता त्यांनी कोर्टामध्ये अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे.

नवी मुंबईतील न्यायालयाने मनोरमा खेडकर यांना मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यावर आता 13 ऑक्टोबरला पून्हा सुनावणी होणार आहे. तोपर्यंत पोलीस त्यांना अटक करू शकणार नाहीत.

अटकपूर्व जामीन मिळवण्यासाठी मनोरमा खेडकर यांनी आपलं म्हणणं कोर्टाला सादर केला आहे. यामध्ये त्यांनी आपण अपहरण केलं नसून त्या क्लिनरचा पाहुणचार केला असल्याचा दावा मनोरमा खेडकरचा न्यायालयात केला.

Manorama Khedkar
Pranjal Khewalkar : एकनाथ खडसेंच्या जावयाच्या प्रकरणात मोठा ट्विस्ट, फॉरेन्सिक रिपोर्टमुळे मिळणार 'त्या' आरोपातून क्लिनचिट?

मला चुकीच्या आरोपात फसवलं गेल आहे.माझा पती फक्त गाडीच्या नुकसानीवर चर्चा करण्यासाठी क्लिनर प्रल्हाद कुमारला घरी घेऊन आला.प्रल्हाद रात्री उशिरा त्यांच्या घरी राहिला आणि सकाळी ९.३० वाजता माझ्या ड्रायव्हरने त्याला पुण्यातील बस स्थानकावर सोडले.मी सन्माननीय महिला असून पूर्वी कोणत्याही प्रकरणात दोषी नाही.

तसेच अपमान टाळण्यासाठी मला अटक होऊ नये असेही त्यांनी न्यायालयात सांगितले आहे.मी बेलचा गैरवापर करणार नाही आणि सर्व अटी पाळेन.या प्रकरणात मला फसवून गोवण्यात आले कारण माझ्या मुलीच्या UPSC निवडीसंदर्भातील वाद आहे असेही त्यांनी न्यायालयात सांगितले ची माहिती सामाजिक कार्यकर्ते विजय कुंभार यांनी दिली आहे.

Manorama Khedkar
Chandrashekhar Bawankule : प्रत्येक गावात होणार 100% पीक पाहणी; बावनकुळेंचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

काय आहे प्रकरण

मनोरमा खेडकर अपहरण प्रकरण हे विवादास्पद IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईशी संबंधित आहे. सप्टेंबर २०२५ मध्ये नवी मुंबईत त्यांच्या कारला एका ट्रकने धडक दिली, ज्यामुळे वाद झाला. मनोरमा खेडकर यांनी ट्रक ड्रायव्हर प्रल्हाद कुमार आणि त्याच्या क्लिनरला अपहरण करून पुण्यातील त्यांच्या बंगल्यावर नेले आणि नुकसानभरपाईची मागणी केली. पोलिसांनी ड्रायव्हरला सोडवले, पण मनोरमा, त्यांचे पती दिलीप आणि बॉडीगार्ड फरार झाले. पोलिसांच्या घरी छाप्यावेळी मनोरमांनी कुत्रे सोडल्याचा आरोप आहे.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com