Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांनी केलेले आंदोलन आणि त्यानंतर सुरू असणाऱ्या कुणबी नोंदी शोधण्याच्या कामाच्या अनुषंगाने वादग्रस्त विधाने केल्याप्रकरणी अन्न व पुरवठामंत्री छगन भुजबळ यांच्याविरोधात आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. तसेच भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली.
मराठा आरक्षणासाठी Maratha Reservation अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे Manoj Jarange यांनी आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनास राज्यभरातील मराठा बांधवांनी पाठिंबा देत सक्रिय सहभाग नोंदवला. राज्यव्यापी सुरू झालेल्या आंदोलनाची दखल घेत मागणीची पूर्तता करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली शासनाने समिती नेमली.
या समितीच्या मार्फतीने कुणबी नोंदी शोधण्याचे काम सुरू आहे. या कामादरम्यान कुणबी नोंदी असणारी हजारो जुनी कागदपत्रे सापडू लागली आहेत. याच अनुषंगाने भुजबळ यांनी मराठ्यांची मागच्या दाराने घुसखोरी सुरू असून, संघर्ष अटळ असल्याचे विधान केले होते.
या विधानाचा राज्यभरातील मराठा बांधव निषेध करत आहेत. याच अनुषंगाने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निषेध करण्यात आला. यात संदीप पोळ, बापू क्षीरसागर, अमोल नलावडे, दत्तात्रय माने, संतोष सावंत, शरद जाधव, वैभव शिंदे व इतर सहभागी झाले होते. Maharashtra Political News
याबाबतचे निवेदन आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालयास दिले आहे. यात भुजबळ यांनी विशिष्ट समुदायाची बाजू घेऊन पद आणि गोपनीयतेच्या शपथेचा भंग केला असून, त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी करण्यात आली आहे.
Edited By : Umesh Bambare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.