Pune News: मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा तापणार?; आरक्षणाच्या लढ्यासाठी पिंपरी-चिंचवडला होणार मराठा आरक्षण एल्गार परिषद

Maratha Reservation : येत्या ६ मे रोजी पिंपरी-चिंचवडला मराठा आरक्षण एल्गार परिषद घेण्याची घोषणा मराठा आरक्षण समन्वय समितीने आज केली.
Maratha Reservation
Maratha ReservationSarkarnama
Published on
Updated on

पिंपरी : मराठा आरक्षणाची पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच फेटाळली. त्यामुळे आरक्षणाचा लढा तीव्र करण्यासाठी येत्या ६ मे रोजी पिंपरी-चिंचवडला मराठा आरक्षण एल्गार परिषद घेण्याची घोषणा मराठा आरक्षण समन्वय समितीने आज केली.

मराठा आरक्षणाला राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली, असा दावा मराठा आरक्षण समन्वय समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष जावळे-पाटील यांनी आज पिंपरीत पत्रकार परिषदेत केला. मराठा आरक्षण समन्वय समिती, मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यांची ही आरक्षण एल्गार परिषद श्रमशक्ती भवन, पुणे, मुंबई महामार्ग, आकुर्डी येथे दुपारी १२ वाजता होणार आहे.

Maratha Reservation
APMC Election : बाजार समिती निवडणुकीत गाजत आहे, उद्धव ठाकरेंच्या सैनिकाची ‘ही’ पोस्ट !

मराठा आरक्षणाचा प्रश्न तात्काळ सोडवावा, आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नोकर भरती करू नये, अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे काम तात्काळ सुरू करावे, पंजाबराव देशमुख निर्वाह भत्ता व वस्तीगृहाचा लाभ सरसकट मराठा विद्यार्थ्यांना मिळावा.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मिळणाऱ्या कर्ज प्रकरणासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात, कोपर्डी प्रकरणातील आरोपींना झालेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तात्काळ करावी, मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील आंदोलकावरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत, या मागण्यांसाठी ही परिषद घेण्यात येत असल्याची माहिती जावळे पाटील यांनी दिली.

Maratha Reservation
Sangola News : "शेकापचा उमेदवार पाडणाऱ्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी आम्हाला पक्षनिष्ठा शिकवू नये"

दरम्यान, राज्यातील सर्व जिल्हा, तालुका समन्वयक, प्रतिनिधी या परिषदेला उपस्थित राहणार आहेत. तसेच मराठा समाज बांधवांनीही उपस्थित राहण्याचे आवाहन मराठा आरक्षण समन्वय समिती, मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले आहे.

Edited By- Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com