

तळेगाव दाभाडे (पुणे): आगामी विधानसभा निवडणुकीला अजून सुमारे तीन वर्षांचा कालावधी असला, तरी मावळ तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही प्रमुख पक्षांनी आतापासूनच संघटनबांधणी, कार्यकर्त्यांच्या बैठका आणि जनसंपर्कावर भर देण्यास सुरुवात केली आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील शेळके विरूध्द भाजपचे माजी मंत्री बाळा भेगडे या मामा भाच्यांची लढत पुन्हा रंगदार होणार आहे. मावळ तालुक्यात दीर्घकाळ काँग्रेसचे वर्चस्व होते.
जवळपास पाच दशकांपर्यंत काँग्रेसची सत्ता कायम राहिली. मात्र, अंतर्गत गटबाजीचा फटका पक्षाला बसला आणि त्यातून भाजपला संधी मिळाली. रूपलेखा ढोरे यांच्या रूपाने मावळमध्ये प्रथमच भाजपचे कमळ फुलले. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे मदन बाफना यांचा पराभव केला.त्यानंतर भाजपचे दिगंबर भेगडे दहा वर्षे आमदार राहिले. त्यानंतर बाळा भेगडे यांनी सलग दहा वर्षे मावळचे प्रतिनिधित्व केले. त्यांच्या कार्यकाळात त्यांना राज्यमंत्रिपदाचीही संधी मिळाली.
दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये उमेदवारीवरून नाराजी निर्माण झाली. सुनील शेळके हे उमेदवारीसाठी प्रबळ इच्छुक होते. मात्र, पक्षाने तिसऱ्यांदा बाळा भेगडे यांनाच उमेदवारी दिली. त्यानंतर सुनील शेळके यांनी भाजपला रामराम ठोकत अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. निवडणुकीत त्यांनी बाळा भेगडे यांचा तब्बल ९० हजार मतांच्या फरकाने पराभव करून मावळमध्ये घड्याळाचा गजर केला.
त्यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बापूसाहेब भेगडे हे उमेदवारीसाठी प्रबळ इच्छुक होते. मात्र, पक्षाने पुन्हा एकदा विद्यमान आमदार सुनील शेळके यांच्यावर विश्वास दाखवला. त्यामुळे बापूसाहेब भेगडे यांनी पक्षाचा राजीनामा देत अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. अनेक पक्षांतील नेत्यांचा पाठिंबा मिळूनही त्यांना यश मिळाले नाही. उलट सुनील शेळके यांनी सुमारे एक लाख मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवत आपले वर्चस्व कायम राखले. दोन मंत्रांचा पराभव, आता पर्यत मावळात हॅटट्रिक नाही
आता पर्यत राष्ट्रवादी काँग्रेसचे मदन बाफना, दोनदा आमदार झाले मंत्री झाले तिस~यावेळी पराभव झाला, भाजपचे दिंगबर भेगडे दोन वेळा आमदार झाले. तिस~या वेळी उमेदवारी मिळाली नाही. भाजपचे बाळा भेगडे सलग दहा वर्ष आमदार झाले,मंत्री झाले तिस~यांना पराभव झाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील शेळके हे सलग दोन वेळा आमदार झाले.मंत्री मंडळाच्या विस्तारात त्यांचा समावेश होण्याची चर्चा असून आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनाच राष्ट्रवादी कडून उमेदवारी मिळणार हे निश्चित असून सुनील शेळके हे हॅटट्रिक करणार का याकडे लक्ष लागले आहे.
गेल्या दोन निवडणुकीत भाजपचे बाळा भेगडे, अपक्ष उमेदवार बापूसाहेब भेगडे या दोघांचा पराभव झाल्याने तालुक्यात राष्ट्रवादी वर्चस्व वाढले, आमदार सुनील शेळके यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत आपले वर्चस्व सिद्ध केले
दोन निवडणुकीत पराभव झाल्यानंतर भाजपमध्ये शांतता पसरली होती मात्र दोन विधानसभा निवडणुकीसह स्थानिक स्वराज्य संस्थांमधील निवडणुकीत झालेला पराभव भरून काढण्यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून भाजपचे जेष्ठ नेते उद्योजक रामदास काकडे, गणेश भेगडे, प्रशांत भागवत, माजी नगराध्यक्ष सुरेखा जाधव, यांच्यासह सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते सक्रिय झाले असून आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे.
गेल्या दोन विधानसभा निवडणुकीत सुनील शेळके यांनी बाळा भेगडे, व बापूसाहेब भेगडे यांचा पराभव केला. आगामी निवडणुकीसाठी बाळा भेगडे यांना तयारी सुरु केली आहे. ते पुन्हा सक्रिय झाले आहेत, तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके हे हॅटट्रिक करण्याच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे आगामी 2029 च्या विधानसभा सभा निवडणुकीत पुन्हा शेळके विरुद्ध भेगडे अशीच लढत होणार असल्याने तालुक्याचे लक्ष लागले आहे.
बाळा भेगडे यांच्या विषयी वरिष्ठ पातळीवर आदर असल्याने त्यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे. बाळा भेगडे हे अभ्यासू नेतृत्व असून ते विधानसभेत पाहिजे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी नुकतेच देहू येथे केले होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.