Narendra Dhabholkar Case : दाभोलकरांच्या हत्येचं समर्थन करणाऱ्या वकिलाला न्यायाधीशांनी फटकारलं; नेमकं काय घडलं?

Narendra Dhabholkar Murder Case : विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांनी दाभोळकर यांच्या हत्येप्रकरणी निकाल देत काही महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत.
Narendra Dhabholkar
Narendra Dhabholkarsarkarnama
Published on
Updated on

Pune News, 10 May : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणात 'सीबीआय'च्या विशेष न्यायालयानं निकाल दिला आहे. याप्रकरणी पाचपैकी सचिन अंदुरे ( Sachin Andure ), शरद कळसकर ( Sharad Pawar Kalskar ) यांना न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोप विरेंद्र तावडे ( Virendra Tawde ), संजीव पुनाळेकर ( Sanjiv Punalekar ), विक्रम भावे ( Vikram Bhave ) यांची न्यायालयानं पुराव्याअभावी निर्दोष सुटका केली आहे. दरम्यान, सुनावणीवेळी आरोपींच्या वकिलांनी दाभोलकर यांच्या हत्येचं समर्थन केलं. त्यावरून न्यायालयानं वकिलांना फटकारलं आहे.

20 ऑगस्ट 2013 मध्ये नरेंद्र दाभोलकर ( Narendra Dhabholkar ) यांची पुण्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पाच आरोपींविरोधात 2021 मध्ये 'सीबीआय'च्या विशेष न्यायालयानं आरोप निश्चित केले होते. आरोपींविरुद्ध भादंवि 302 (खून), 120 ब (कट रचणे), बेकायदा शस्त्र बाळगणे, तसेच बेकायदा हालचाली प्रतिबंधक कायद्यान्वये (यूएपीए) आरोप निश्चित करण्यात आले. सुरुवातीला या खटल्याची सुनावणी विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात झाली. नावंदर यांची बदली झाल्यानंतर विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात सुनावणी झाली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

शुक्रवारी, आज ( 10 मे ) पी.पी. जाधव यांनी निकाल देत काही महत्वपूर्ण निरीक्षणे नोंदवली आहेत. न्यायाधीशांनी म्हटलं, "वीरेंद्रसिंह तावडे याचा हत्या प्रकरणात हेतू दिसून आला नाही. तावडेवर संशय घेण्यासारखी परिस्थिती आहे. पण, विरोधात गुन्हा सिद्ध करण्यात पोलिस आणि सरकार पक्ष अपयशी ठरले आहेत. विक्रम भावे, संजीव पुनावळेकर यांच्याविरोधात देखील सक्षम पुरावे सादर करण्यात पोलिसांना यश आलेलं नाही. त्यामुळे तीनही आरोपींची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात येत आहे."

"...म्हणून अंदुरे, कळसकरला शिक्षा"

"सचिन अंदुरे आणि शरद कळसकरनं गोळीबार केल्याची कबुली दिली आहे. त्यांच्या विरोधातील सक्षम पुरावे पोलिसांनी न्यायालयात सादर केले. त्याआधारे दोघांना शिक्षा सुनावण्यात येत आहे," असं न्यायाधीशांनी सांगितलं.

"हत्येचं समर्थन चुकीचं"

खटल्याची सुनावमी सुरू असताना बचाव पक्षाच्या वकिलांनी अनेक मुद्द्यांवरून युक्तिवाद केला. त्यातील एका युक्तीवादात बचाव पक्षाच्या वकिलांनी आरोपींची बाजू मांडताना डॉ. दाभोलकर यांच्या हत्येच्या गुन्ह्यांचे समर्थन केलं. यावरून न्यायालयानं वकिलांना कडक शब्दांत सुनावलं आहे. "ही बाब अत्यंत गंभीर असून अशाप्रकारे गुन्ह्याचं समर्थन करणं योग्य नाही. वकिलांनी भविष्यात ही चूक सुधारावी," असं न्यायाधीशांनी नमूद केलं.

"तपास अधिकाऱ्यांचा निष्काळजीपणा"

"आरोपींवर संशय घेण्यास वाव असताना तपास अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे तपास न केल्यामुळे त्यासह तपासात निष्काळजीपणा दाखवल्यानं तीन आरोपींची सबळ पुराव्याअभावी निर्षोद मुक्तता करण्यात येत आहे. तसेच, 'युएपीए'चे कलम सिद्ध होऊ शकले नाही," असंही न्यायाधीशांनी म्हटलं.

Narendra Dhabholkar
Narendra Dhabholkar Case : दाभोलकर निकालामुळे पानसरे, लंकेश, कलबुर्गी प्रकरणांची चर्चा; न्याय कधी मिळणार?

संजीव पुनावळेकरचा अर्ज फेटाळला

या खटल्यातील तपास अधिकाऱ्यांनी अन्यायानं कैदेत ठेवत, मला गुन्ह्यात गोवलं. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, असा अर्ज संजीव पुनावळेकर यांनी न्यायालयात केला होता. या अर्जाची चौकशी केली असता, त्यात काही तथ्य आढळून आले नाही, असं नमूद करत न्यायाधीशांनी हा अर्ज फेटाळून लावला आहे.

Narendra Dhabholkar
Narendra Dabholkar Murder Case : मारेकऱ्यांना जन्मठेप, पण मास्टरमाइंडच्या शिक्षेसाठी हायकोर्टात लढाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com