Sanjog Waghere Patil : शक्तिप्रदर्शन करत वाघेरेंनी भरला उमेदवारी अर्ज; आदित्य ठाकरे, अमोल कोल्हे अन् रोहित पवारांची उपस्थिती

Maval Lok Sabha Constituency : अर्ज भरण्याच्या सहाव्या दिवशी मावळमध्ये सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले.
Sanjog Waghere Patil
Sanjog Waghere PatilSarkarnama

Loksabha Election 2024 : मावळ लोकसभेतील महायुतीचे (शिंदे शिवसेना) उमेदवार श्रीरंग बारणे यांनी सोमवार (ता.22) शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरला. तसा तो मंगळवारी (ता.23) महाविकास आघाडीचे (ठाकरे शिवसेना) संजोग वाघेरे-पाटील यांनी दाखल केला. यावेळी शिवसेना नेते आदित्य ठाकरेंसह आघाडीचे बडे नेते उपस्थित होते.

बारणेंसारखी वाघेरेंनीही पिंपरी-चिंचवडमधून रॅली काढून उमेदवारी अर्ज भरला. यावेळी शरद पवार राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार,कॉंग्रेसचे संजय जगताप, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख (मावळ) आणि माजी आमदार गौतम चाबुकस्वार, कॉंग्रेसचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष कैलास कदम आदी उपस्थित होते. मावळात गद्दारी गाडली जाऊन निष्ठावंत शिवसैनिकांचा विजय होईल आणि स्वाभिमानी ठाकरे शिवसेना मावळचा गड कायम राखेल,असा दावा अर्ज भरल्यानंतर वाघेरेंनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjog Waghere Patil
Rohit Pawar News : पार्थ चिंता करू नकोस, तुझ्या पराभवाचा बदला घेणार; रोहित पवारांचा अजितदादांना टोला

रॅलीपूर्वी वाघेरेंनी महापुरुषांना अभिवादन केले. तसेच आराध्य दैवतांच्या मंदिरात जाऊन आशीर्वाद घेतले.आदित्य रॅलीत सहभागी झाले होते."गद्दारांचा भरला घडा, त्यांना शिकवू धडा", "एकजुटीने जागवा, निर्धार भगवा", "आता हवा, खासदार नवा", "आली रे आली, पाटलांची बारी आली" अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.

रॅलीचे रुपांतर जाहीर सभेत होऊ तेथे आदित्य ठाकरे, रोहित पवार, यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माणिकराव ठाकरे, शरद पवार राष्ट्रवादीचे शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे आदींची भाषणे झाली.

दरम्यान,अर्ज भरण्याच्या सहाव्या दिवशी मावळमध्ये सहा उमेदवारांनी अर्ज दाखल केले. त्यामुळे ते भरणाऱ्यांची संख्या आता दहा झाली.वाघेरेंनी दोन अर्ज भरले.आज तिघांनी ९ अर्ज नेले.वंचित बहूजन आघाडीच्या माधवी जोशी यांनी काल अर्ज नेला. त्यांनी तो भरल्यानंतर मावळची लढत 2019 सारखी पुन्हा तिरंगी होणार आहे.आतापर्यंत 69 व्यक्तींनी 134 उमेदवारी अर्ज नेले आहेत.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Sanjog Waghere Patil
Amol Kolhe : 'आता दिल्लीचे तख्त पलटवू शकतो महाराष्ट्र माझा..!' अमोल कोल्हेंची डरकाळी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com