Maval Lok Sabha Constituency : प्रचार आला घाटावर, युती, आघाडीचा आता थेट प्रचार झाला मावळमध्ये सुरू !

Heavy campaigning started in Maval : अर्ज दाखल करण्यापूर्वीच मावळात जोरदार प्रचार सुरू, आघा़डी आणि युतीचा प्रचार मेळावा रविवार आणि सोमवारी
Sanjog Vaghere Patil VS MP Srirang Barne
Sanjog Vaghere Patil VS MP Srirang BarneSarkarnama

Maval News : लोकसभा मतदारसंघातील दोन्ही प्रमुख म्हणजे युती आणि आघाडीचे उमेदवार हे घाटावरील आणि पिंपरी-चिंचवडकर आहेत. मात्र, त्यांनी प्रचाराचे रणशिंग घाटाखाली फुंकले. आता त्यांनी घाटावर प्रचार सुरू केला असून, त्यासाठी येत्या तीन दिवसांत ते आपापले पहिले प्रचार मेळावे घेणार आहेत.

दरम्यान, दोन्ही उमेदवारांचा वैयक्तिक आणि त्यांच्या पक्ष पातळीवर प्रचार आतापर्यंत सुरू होता. त्यात नाराजांची मनधरणी ते करीत होते. उमेदवारी न मिळालेल्यांच्या भेटी घेऊन त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न सुरू होता. आता त्याला युती आणि आघाडी म्हणून प्रचार होणार आहे. त्यातून खरंच दोन्हीकडच्या तिन्ही मुख्य पक्षांत समन्यवय, एकी आहे का, नाराजी नाही ना हे दिसणार आहे. कारण शिरूरच्या (Shirur) युतीच्या नुकत्याच झालेल्या समन्वय बैठकीकडे भोसरी, खेड, जुन्नर विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या तीन मोठ्या नेत्यांनी पाठ फिरवली होती. त्यामुळे मावळच्या युती, आघाडीच्या पहिल्याच प्रचार मेळाव्याला शिरूरसारखा 'नाट तर लागणार नाही ना', याकडे आता लक्ष लागले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Sanjog Vaghere Patil VS MP Srirang Barne
Shoma Sen News : भीमा कोरेगाव प्रकरणी प्रा. शोमा सेन यांचा जामीन मंजूर; सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा

मावळ (Maval) लोकसभा मतदारसंघ निम्मा घाटावर आणि तेवढाच घाटाखाली आहे. म्हणजे विधानसभेचे तीन-तीन मतदारसंघ पुणे आणि राय़़गड जिल्ह्यात आहेत. तेथे चौथ्या टप्प्यात मतदान आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज दाखल करणे सुरू झालेले नाही. मात्र, अर्ज दाखल न होताही प्रचार तेथे जोरात सुरू झाला आहे. मावळचे युतीचे (शिंदे शिवसेना) उमेदवार श्रीरंग बारणे, तर आघाडीचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना) संजोग वाघेरे-पाटील हे घाटावरील पिंपरी-चिंचवडकर आहेत.

या दोन्ही उमेदवारांनी त्यांचा वैयक्तिक प्रचार आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदारांच्या गाठीभेटीस सुरुवात घाटाखालून प्रथम केली. आता ते घाटावर प्रचार करू लागले आहेत. महाआघाडी (MahaVikas Aghadi) आणि युती म्हणून त्यांनी आपला प्रचार जोरदार सुरू केला आहे. त्यासाठी आघाडीचा पहिला कार्यकर्ता मेळावा येत्या रविवारी (7 एप्रिलला) पिंपरी-चिंचवडमध्ये रहाटणी येथे, तर युतीचा सोमवारी (8 एप्रिलला) होणार आहे.

Edited By : Chaitanya Machale

R

Sanjog Vaghere Patil VS MP Srirang Barne
EVM Theft News : 'ईव्हीएम' चोरी प्रकरणातील अधिकाऱ्यांचे निलंबन अखेर रद्द !

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com