
Shrirang Appa Barne : लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी अर्जासोबतच्या शपथपत्रात खोटी माहिती दिल्याच्या आरोपांखाली मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांच्याविरोधात खटला चालवण्याचे आदेश वडगाव मावळच्या विशेष न्यायालयाने दिले आहेत.
अनिल भांगरे आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी 2021 मध्ये श्रीरंग बारणे यांच्या शपथपत्राबाबत तक्रार केली होती. या तक्रारीच्या आधारे न्यायालयाने पोलीस चौकशीचे आदेश दिले होते. या चौकशी अहवालाच्या आधारे न्यायालयाने खटला चालवण्यास संमती दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीरंग बारणे यांनी 2009 मधील शपथपत्रात दहावी उत्तीर्ण, सन 1989 असा उल्लेख केला होता. तर 2019 च्या शपथपत्रात त्यांनी शैक्षणिक पात्रता दहावी नापास असे नमूद केले होते. त्यांनी ही माहिती जाणूनबुजून चुकीची दिल्याचा आरोप अनिल भांगरे आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी केला होता.
याशिवाय, बारणे यांनी प्रलंबित प्रकरणांची माहिती लपवली असल्याचा आरोपही केला आहे. यात पिंपरी न्यायालयातील एक प्रकरण आणि निगडी पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्याचा समावेश आहे. या तक्रारीची दखल घेऊन न्यायालयाने याबाबत वडगाव मावळ पोलिसांना चौकशीचे आदेश दिले. या चौकशी अहवालाच्या आधारे डॉ. हरिदास यांनी युक्तिवाद केला.
यानंतर न्यायालयाने बारणे यांच्याविरोधात लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 मधील कलम 125 अ अंतर्गत कार्यवाही सुरू करण्यास पुरेशी कारणे असल्याचे नमूद करून खटल्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. बारणे यांच्यावरील आरोप न्यायालयात सिद्ध झाल्यास त्यांच्यावर खासदारकी रद्द होण्याची कारवाई होऊ शकते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.