

Pune, 6 march 2026: राज्यात तिथीनुसार असलेली शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात असताना दुसरीकडे मावळातून हृदयद्रावक बातमी समोर येत आहे.
विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत आणण्यासाठी जात असताना झालेल्या भीषण अपघातात दोन शिवभक्त तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे मावळ परिसरातील शिंदे घाटेवाडीत हळहळ व्यक्त होत आहे.
दर्शन बाबू शिंदे (वय १५) आणि ओमकार दत्ता आढळे (वय २३) अशी मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. मावळ तालुक्यातील आंदर मावळ परिसरातील शिंदे घाटेवाडी येथील शिवजयंती तरुण मंडळाचे हे दोन्ही कार्यकर्ते शिवजयंती निमित्त विसापूर किल्ल्यावरून शिवज्योत आणण्यासाठी दुचाकीवरुन जात होते.
पुणे–मुंबई महामार्गावरील नायगाव येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयासमोर MH 14 JA 5111 क्रमांकाच्या शिफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. यात ते गंभीर जखमी झाले, त्यांचा जागीत मृत्यू झाला.
या अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिक आणि पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पण उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. शिवजयंतीच्या दिवशीच दोन तरुण शिवभक्तांचा गमावल्याने शिंदे घाटेवाडीत गावात शोककळा पसरली आहे.
जुन्या पुणे–मुंबई महामार्गावरील नायगाव परिसरात हे शिवभक्त मध्यरात्रीच्या सुमारास, सुमारे दीड वाजण्याच्या सुमारास पोहोचले होते. त्यावेळी ते शिवज्योत घेऊन धावत असतानाच विरुद्ध दिशेने येणारी एक कार अचानक दुभाजक ओलांडून त्यांच्या दिशेने आली. कारचालकाने बेदरकारपणे वाहन चालवत या दोघांना जोरदार धडक दिली, यात त्यांचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी रुग्णालयात पाठवले असून या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.