Medha Kulkarni on Pune Crime : मेधा कुलकर्णीं म्हणतात, 'पुण्याची संस्कृती बिघडू न देण्यासाठी पोलिसांनी..'

Medha Kulkarni to Pune Police : रविंद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी पोलिसांवर केलेल्या 'त्या' आरोपांबाबतही मेधा कुलकर्णींनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
Medha Kulkarni On Pune Police
Medha Kulkarni On Pune PoliceSarkarnama

पुणे शहरामध्ये चालू असलेले गैरप्रकारांचे सत्र आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकार, प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले आहे. फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील बारच्या मालकावर, चालकावर आणि अन्य काही लोकांवर गुन्हा दाखल झाला आहे.

याच प्रमाणे शहरांमधील सर्व अवैध गोष्टींना पोलिस आयुक्तांनी आळा घालावा. तसेच महापालिकेच्या आयुक्तांनीही देखील शहरातील अवैध अनधिकृत बार आणि रूप टॉप हॉटेल्सवर कारवाई करावी अशी, अपेक्षा राज्यसभेच्या खासदार आणि भाजपाच्या नेत्या मेधाताई कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.

फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावरील एका बारमध्ये तरुण ड्रग्जचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमुळे सर्वत्र चांगलीच खळबळ उडाली. पुणे पोलीस यांच्यासह राज्य उत्पादन शुल्क विभागाने या ठिकाणी भेट देत हा बार सील केला.

या प्रकरणी पोलिसांनी पाच ते सहा जणांना अटक केली असून कामात कुचराईचा ठपका ठेवत दोन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसह बीट मार्शल यांना निलंबित करण्याचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत.

Medha Kulkarni On Pune Police
Medha Kulkarni On Porsche Accident : 'ब्लॅक पबच्या मालकाचे नाव का वगळले?' मेधा कुलकर्णींनी आयुक्तांना सुनावले खडेबोल

पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केलेल्या कारवाईचे राज्यसभेच्या खासदार मेधाताई कुलकर्णी(Medha Kulkarni) यांनी स्वागत केले आहे. त्या म्हणाल्या, अशाच पद्धतीने पोलिसांनी ॲक्शन मोडमध्ये येऊन पुणे शहरांमधील सर्व अवैध गोष्टींना आळा घालावा.

त्याचबरोबर महापालिकेच्या आयुक्तांनी देखील बेकायदा पद्धतीने उभारण्यात आलेले बार आणि रूफ टॉप हॉटेल्सवर त्वरित कारवाई करावी. यापूर्वी देखील बेकायदा पद्धतीने सुरू असलेल्या रुफ टॉप हॉटेलवर कारवाई करण्याची मागणी खासदार कुलकर्णी यांनी केली होती. त्याचाच पुनरुच्चार त्यांनी केला.

पुणे शहराची सांस्कृतिक ओळख कुठल्याही पद्धतीने बदलू दिली जाणार नाही. चुकीच्या तसेच नागरिकांच्या हिताला बाधा आणणाऱ्या गोष्टी अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याबाबत अत्यंत स्पष्ट आणि कडक सूचना दिलेल्या आहेत.

काँग्रेसच्या एका आमदाराने आणि विरोधी पक्षाच्या एका महिला पदाधिकारी यांनी यापूर्वी जे आरोप केले होते, त्याचा त्यांनी काय पाठपुरावा केला? त्या विषयात ते गप्प का? माझी मागणी आहे की एक्साईज खात्यातील अधिकारी आणि पोलीस अधिकारी यांच्याबद्दल त्या आरोपांचे काय झाले, याची चौकशी झाली पाहिजे.

Medha Kulkarni On Pune Police
Pune Drug Case : पुण्यातला तो बार 'पतित पावन'ने फोडला!

आरोप करणारे आता गप्प का? -

काही दिवसांपूर्वी त्यांनी जे आरोप केले होते त्याबाबत आता ते गप्प का? अशा प्रकारचा प्रश्न जनता उपस्थित करीत आहे. आमदार रवींद्र धंगेकर(Ravindra Dhangekar), शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जे आरोप केले होते, त्या पोलीस अधिकाऱ्यांची आणि एक्साईज अधिकाऱ्यांची चौकशी करावी.

यामध्ये ते जर दोषी असतील तर अशा दोषी अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी. जर ते दोषी नसतील तर खोटे आरोप केल्याबद्दल या लोकप्रतिनिधींवर कारवाई करावी, असेही खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com