Punjab Politics : युतीच्या चर्चेदरम्यान राजकीय पक्षाला झटका, माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश; पंजाबच्या राजकारणात भूकंप

Former Punjab CM Cousin Bhupinder Singh Dhillon Joins BJP: आगामी पंजाबमधील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून भाजप आणि शिरोमणी अकाली दल यांच्यात युतीबाबत चर्चा सुरू आहेत.
Punjab political party gets setback during alliance talks
SAD Leader Bhupinder Singh Dhillon Joins BJP in Punjab; Haryana CM Nayab Singh SainiSarkarnama
Published on
Updated on

Punjab politician joins BJP: पंजाबमध्ये आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोरदार राजकीय घडामोडी होताना दिसत आहेत. एकीकडे शिरोमणी अकाली दल (एसएडी) आणि भारतीय जनता पार्टी (भाजप) यांच्यात युतीच्या चर्चांना जोर आला आहे.

तोच दुसरीकडे भाजपनेच अकाली दलाला राजकीय धक्का दिल्याचे समोर आले आहे. दिवंगत माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचे चुलत भाऊ, मेजर (निवृत्त) भूपिंदर सिंग ढिल्लन यांनी शिरोमणी अकाली दलाला रामराम केला असून भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सैनी यांच्या उपस्थितीत चंदीगडमधील सेक्टर ३७ येथील पंजाब भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मुख्यमंत्री नायब सिंग सैनी यांनी, मेजर भूपिंदर सिंग यांचे स्वागत करत, भाजपला मजबूत करण्यासह पंजाबला देशातील क्रमांक एकचे राज्य बनवण्याची शपथ घेतल्याचे सांगितले.

पक्षात सामील होणाऱ्या प्रत्येकाला योग्य सन्मान दिला जाईल. यापूर्वी राज्यात काँग्रेसचे सरकार होते पण काँग्रेसला आपली आश्वासने पूर्ण करता आली नाहीत. ते भ्रष्टाचारात बुडाले होते. ज्यामुळे राज्यातील जनता कंटाळली होती. यामुळेच जनतेने त्यांना सत्तेतून बाहेरचा रस्ता दाखवल्याचा दावा देखील मुख्यमंत्री सैनी यांनी केला.

Punjab political party gets setback during alliance talks
Punjab Politics : मुख्यमंत्र्यांचं टेन्शन वाढलयं ; एका मंत्र्याचा राजीनामा, मंत्रिमंडळ विस्ताराचे संकेत

धक्कादायक म्हणजे यावेळी भूपिंदर सिंग यांचाच फक्त भाजप प्रवेश झाला नसून त्यांचे पुत्र अमरवीर सिंग यांनी देखील भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे पंजाबमध्ये राजकीय भूकंप आला असून पंजाबच्या राजकारणात भापची ताकद वाढल्याचे आता बोलले जात आहे.

भूपिंदर सिंग हे दिवंगत मुख्यमंत्री प्रकाश सिंग बादल यांचे चुलत भाऊ असून ते त्यांनी २५ वर्षे त्यांचे सचिव म्हणून काम पाहिले होते. त्यांनी भारतीय सैन्यात सेवा बजावली असून १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धात सक्रिय सहभाग घेतला होता. ते १९८८ पर्यंत भारतीय सैन्यात होते. तर १९९४ पासून भूपिंदर सिंग यांनी राजकारणात सक्रिय भाग घेतला.

यानंतर त्यांनी १९९७ ते २००२ या काळात अकाली दल सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणूनही काम केले. त्यांचे वडील, दिवंगत गुरराज सिंग यांनी देखील शिरोमणी अकाली दलाचे प्रतिनिधित्व केले होते. १९५२ ते १९५८ या काळात ते राज्यसभेचे खासदार होते.

Punjab political party gets setback during alliance talks
Punjab Election: पंजाबमध्ये भाजप मुसंडी मारणार? दुरावलेल्या जुन्या मित्राची मिळाली साथ; मतदारसंघ पुनर्रचना, महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा जाहीर

दरम्यान आता मेजर भूपिंदर सिंग यांचा भाजपमधील प्रवेशामुळे पंजाबच्या राजकारणात नव्या राजकीय समीकरणांचा उदय झाल्याची चर्चा आहे. विशेषतः माळवा प्रदेशात, भाजपच्या संघटनात्मक आणि राजकीय विस्ताराच्या दिशेने देखील महत्त्वाचे पाऊल म्हणून पाहिले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com