MLC Election : शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पहिला उमेदवार जाहीर! सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीसोबत टक्कर!

Sharad Pawar NCP Srikant Patil : स्थानिक स्वराज संस्था पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी सामना होणार आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून श्रीकांत पाटील अर्ज दाखल करणार आहेत.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

MLC Election News : स्थानिक स्वराज संस्थामधून विधान परिषदेसाठी होत असलेली निवडणूक महाविकास आघाडीने लढण्याचा निर्णय घेतला आहे. 17 जागांच्या वाटपाबाबत महाविकास आघाडीत पुण्याची जागा कोणाकडे राहणार याची उत्सुकता होती. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पुण्याची जागा लढण्याचा निर्णय घेतला आहे.

दरम्यान, 'साम टिव्ही'ने दिलेल्या वृत्तानुसार, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून शहराध्यक्ष श्रीकांत पाटील हे ही निवडणूक लढवणार. पक्षाने त्यांची उमेदवारी शिक्कामोर्तब केली आहे.

श्रीकांत पाटील यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शरद पवारांचे आदेश आहे. शरद पवारांनी श्रीकांत पाटील यांना फोन केला होता.

महायुतीमध्ये पुण्याची जागा ही सुनेत्रा पवार नेतृत्व करत असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मिळण्याची शक्यता आहे. या पक्षाचे सर्वाधिक सदस्य स्थानिक स्वराज संस्थेमध्ये आहेत. या पार्श्वभूमीवर ही जागा सुनेत्रा पवार यांच्या राष्ट्रवादीकडे असेल असे निश्चित मानले जात आहे.

सुनेत्रा पवार येथे कोणाल उमेदवारी देणार याची चर्चा सुरू असताना शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून श्रीकांत पाटील हे मैदानात असणार आहेत. त्यामुळे या जागेवर राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी असा सामना होण्याची शक्यता आहे.

पुण्याची जागा महायुतीमध्ये भाजपला मिळावी यासाठी पुण्यातील नेत्यांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. पुण्यातील नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ही जागा भाजपकडे ठेवण्याची मागणी केली आहे. मात्र, संख्याबळ पाहता ही जागा सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीकडे कायम राहणार असल्याचे दिसते आहे.

Sharad Pawar
MLC Election : सांगली-सातारा विधानपरिषदेसाठी 'राष्ट्रवादी'चा पुन्हा ZP पॅटर्न? संख्याबळाने वाढवली भाजपची धडधड

महायुतीचा फाॅर्म्युला ठरला!

महाविकास आघाडीत जागा वाटपचा फाॅर्म्युला ठरला आहे. काँग्रेस आठ जागांवर लढणार आहे. तर, शरद पवारांची राष्ट्रवादी तीन जागांवर लढणार आहे. तर, ठाकरेंची शिवसेना चार जागांवर लढणार आहे. पुणे आणि ठाण्याची जागा ही शरद पवारांची राष्ट्रवादी लढणार आहे.

तीन जागांची मागणी

सुनेत्रा पवार यांनी माध्यमांशी बोलातना स्पष्ट केले की, महायुतीमध्ये ज्या ठिकाणी आमच्याकडे आकडे आहेत ती जागा आम्हाला मिळावी अशी आमची अपेक्षा आहे. तीन जागांची मागणी आम्ही केली आहे. सकारात्मक निर्णय होईल, असी आमची अपेक्षा आहे. असे देखील त्यांनी सांगितले. दरम्यान, त्यांच्या वाट्याला दोन जागा आल्या असून त्या पुणे आणि रायगडची जागा लढणार आहेत. रायगडमधून अनिकेत तटकरे हे उमेदवार असणार आहेत. मात्र, पुण्याचा उमेदवार अजून जाहीर झाला नाही.

Sharad Pawar
Yavatmal-Washim MLC election: काँग्रेसने निवडणुकीपूर्वीच शस्त्र टाकली; उमेदवारीसाठीच्या ‘रसद’मुळे विधानपरिषदेच्या मैदानात बॅकफूटवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com