वसंत मोरेंच्या एकला चलो रे भूमिकेनं मनसेचं वाढलं टेन्शन

वसंत मोरेंच्या एकला चलो रे भूमिकेवरून राजकारण तापलं
Vasant More Latest News in Marathi, Pune MNS Latest News
Vasant More Latest News in Marathi, Pune MNS Latest NewsSarkarnama
Published on
Updated on

पुणे : राज्यात भोंग्याच्या प्रकरणावरुन वातावरण तापलं आहे. याबाबत आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या (MNS) शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची भेट घेतली. या वेळी पुण्यातील मनसेचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते पण नगरसेवक वसंत मोरेंनी (Vasant More) उशिरा पोचले. यामुळं पुन्हा एकदा वसंत मोरेंच्या एकला चलो रे या भूमिकेवरून राजकारण तापलं आहे. (Vasant More Latest News in Marathi)

मुंबई पोलिसांनी भोंग्याच्या आवाजाच्या पातळीबाबत पत्रक काढले आहे. तसेच पत्रक पुणे पोलिसांनी काढावे, अशी मागणी मनसेच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांकडे केली. मुंबई पोलिसांनी आवाजासंदर्भात नियमावली जाहीर केली आहेत. त्याच प्रकारचा निर्णय पुणे पोलिसांनी घ्यावा, असा मनसेचा आग्रह आहे. मनसेच्या शिष्टमंडळात पक्षाचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांच्यासह बाबू वागस्कर, बाळा शेडगे, गणेश सातपुते उपस्थित होते. पण नेमके वसंत मोरे उशिरा आल्यानं चर्चांना उधाण आले आहे.

Vasant More Latest News in Marathi, Pune MNS Latest News
काँग्रेसवर नाराज असलेल्या हार्दिक पटेलांवर भाजपचं सरकार झालं मेहरबान!

मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशानुसार पोलीस आयुक्तांची भेट घेतल्याचे मनसे पदाधिकाऱ्यांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की, आवाजाच्या नियमावलीबाबत आम्हाला लोकांचे फोन येत आहेत. याबाबत पोलिसांनी माहिती नाही दिली तर आम्ही पक्ष म्हणून निर्णय घेऊ. पुढील दहा दिवसांत पुणे पोलिसांनी आम्हाला माहिती देण्याचे आश्वासन दिलं आहे. त्यांच्या निर्णयानंतर आम्ही पुढील भूमिका जाहीर करू.

Vasant More Latest News in Marathi, Pune MNS Latest News
हार्दिक पटेलांची नाराजी दूर करण्यासाठी राहुल गांधींची अशीही खेळी

या भेटीवेळी वसंत मोरे यांच्याबद्दल विचारले असता पदाधिकाऱ्यांनी कोणतेही मतभेद असल्याचा इन्कार केला. आधीच्या बैठकीला मोरे उपस्थित होते, आमच्यात काही मतभेद नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. याबद्दल वसंत मोरे यांना विचारले असता ते म्हणाले की, मी हजर नसलो तरी राजमार्गावर आहे. राज ठाकरे आले तरच मी शहर कार्यालयात जाईन. एकला चलो रे असलो तरी मी पक्षातच असून राजमार्गावर आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com