Pune News : जावडेकरसाहेब पुण्याबद्दल आकस नसेल तर एवढं कराच; मोहन जोशींचे आवाहन !

Mohan Joshi Appeal Prakash Javadekar : पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाला नख लावणाऱ्यांना पुणेकर माफ करणार नाही
Mohan Joshi, Prakash Javadekar
Mohan Joshi, Prakash JavadekarSarkarnama
Published on: 
Updated on: 

Congress vs BJP : आकाशवाणी पुणे केंद्रातील प्रादेशिक वृत्त विभाग बंद केले जात आहे. आता हे केंद्र छत्रपती संभाजीनगरला स्थलांतर करण्याचा निर्णय प्रसार भारतीने घेतला आहे. यातून भाजप पुण्याचे सांस्कृतिक वैभव नष्ट करत आहे. या पार्श्वभूमीवर माजी केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री व पुणेकर असणारे प्रकाश जावडेकर यांनी पुढाकार घेणे अपेक्षित आहे. त्यांना पुण्याबद्दल आकस नसेल तर किमान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे प्रयत्न करून हा निर्णय रद्द होण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी केले. (Latest Marathi News)

Mohan Joshi, Prakash Javadekar
Mantralay News : मोठी बातमी! काम होत नसल्याचा आरोप करत वृध्द महिलेचा मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न

भाजपच्या धोरणांवर यावेळी आरोप करून जोशी यांनी आंदोनलाचा इशाराही दिला आहे. जोशी म्हणाले, "शिवाजीनगर येथे मोठे मेट्रो स्टेशन होत आहे. त्यामुळे तेथील पुणे आकाशवाणीच्या सुमारे चार एकर जागेवर भाजपचा डोळा आहे. ती जागा बिल्डरच्या फायद्यासाठी व्यापारी संकुलासाठी वापरली जाईल. त्यामुळे पुणेकरांनी आता संघटीत होऊन भाजपचा हा डाव हाणून पाडला पाहिजे. केंद्र शासनाने हा निर्णय रद्द केला नाही तर काँग्रेसवतीने तीव्र निदर्शने करण्यात येतील."

मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी प्रकाश जावडेकरांवरही निशाणा साधला. ते म्हणाले,"पुणेकर असणारे प्रकाश जावडेकर यांनी केंद्रीय माहिती व नभोवाणी मंत्री असतानाच केंद्राला पुरक निर्णय घेतले. जावडेकरांच्या (Prakash Javadekar) त्या निर्णयामुळे पुण्यातील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाची स्वायत्तता गेली. पुणे (Pune) आकाशवाणीचे प्रादेशिक वृत्ताचे केंद्र गेले. पुणे दूरदर्शनची देखील त्यांनी दुरवस्था करून टाकली. केवळ राज्याचेच नव्हे तर देशाची सांस्कृतिक राजधानी असा पुण्याचा नावलौकिक कमी करण्याचा हा प्रयत्न आहे."

Mohan Joshi, Prakash Javadekar
Raj Thackeray Birthday News : `मराठी माणसाचे आधारकार्ड`, राज ठाकरेंना नवी उपाधी..

पुण्याच्या (Pune) वैभवाला धक्का पोहचवणाऱ्यांना पुणेकर माफ करणार नाही, असा इशाराही जोशी यांनी यावेळी दिला. जोशी म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गुजरातबद्दल प्रेम आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना नागपूरबद्दल प्रेम आहे. मात्र प्रकाश जावडेकरांना पुण्याबद्दल प्रेम आहे काय ? असा प्रश्न पुणेकर विचारत आहेत. पुण्याबद्दल प्रेम असेल तर त्यांनी केंद्रीय माहिती आणि नभोवाणी मंत्री अनुराग ठाकूर यांना पुणे आकाशवाणी केंद्राबद्दलचा निर्णय मागे घेण्यास भाग पाडावे."

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.