Mantralay News : मोठी बातमी! काम होत नसल्याचा आरोप करत वृध्द महिलेचा मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न

Mumbai News : या घटनेमुळे मंत्रालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Mantralay News
Mantralay NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Mumbai : शिंदे फडणवीस सरकार सत्तेत येऊन आता जवळपास एक वर्ष पूर्ण होत आहे. या सरकारची 'निर्णय वेगवान, महाराष्ट्र गतिमान' अशी टॅगलाईन आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्याकडूनही वारंवार आघाडी सरकारवर टीकेची झोड उठवतानाच सध्याचं युतीचं सरकारच्या काळातील महाराष्ट्राच्या प्रगतीचे दाखले दिले जात असतात.

याचवेळी गेल्या काही महिन्यांमध्ये मंत्रालयात आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचंही धक्कादायक वास्तव समोर आलं आहे. याचदरम्यान, मुंबईत एका वृध्द महिलेनं बुधवारी(दि.१४) मंत्रालयाबाहेर आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं एकच खळबळ उडाली आहे.

मुंबईतील मंत्रालया(Mantralay) बाहेर एका वृध्द महिलेकडून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना आज( १४ जून) रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे मंत्रालय परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेची पूर्ण माहिती समोर आलेली नाही.

Mantralay News
BJP Vs Shivsena : 'त्या' जाहिरातीवरून युतीत वादाचा भडका! भाजप खासदार आणि शिवसेना आमदारानं एकमेकांची औकातच काढली...

राज्यातील अनेक जणांना आपल्या समस्या सोडवण्यासाठी मंत्रालयात सारखे खेटे घालावे लागत असतात. वाट पाहूनही समस्या सुटत नसल्याचे पाहून अनेक जण मंत्रालयासमोरच आत्महत्ये(Suicide) चा प्रयत्न करतात. गेल्या काही महिन्यात मंत्रालयासमोरील आत्महत्येच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मार्च २०२२ ते मार्च २०२३ या कालावधीत एकूण ८ जणांनी मंत्रालयासमोर आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Mantralay News
Kalyan-Dombivli Politics : कल्याणमधील सत्तेचे गणित बदलणार? ठाकरे गट आणि भाजपच्या आजी-माजी आमदारांमध्ये बंद दाराआड चर्चा

नेमकं काय घडलं?

एक वृध्द महिला सकाळपासून मंत्रालयात आल्या होत्या. कामे होत नाहीत असा त्यांचा आरोप होता. मात्र, त्यांच्या कामाची कुणी दखल घेत नसल्यामुळे त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसां(Police)नी प्रसंगावधानता दाखवल्यामुळे त्यांना ताब्यात घेतलं. मात्र, मंत्रालयाबाहेरील या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.