Medha Kulkarni Latest News : दीड डझन प्रोजेक्टच्या फाइल घेऊन मेधाताई लागल्या कामाला

Pune Development Issue : महापालिका आयुक्तांकडे मागितली वेळ. राज्यसभेच्या खासदारकीची जबाबदारी घेतल्यानंतर मंगळवारी मेधा कुलकर्णी यांनी ' सरकारनामा'च्या कार्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी आगामी काळातील विविध योजना, पुणेकरांच्या हितासाठी केल्या जाणाऱ्या कामांची माहिती दिली.
Medha Kulkarni
Medha Kulkarni Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : राज्यसभेची खासदारकी मिळाल्यावर भाजपमध्ये ‘हेविवेट’ लीडर ठरलेल्या खासदार मेधा कुलकर्णी आता पुन्हा जुन्या ‘स्टाइल’ने कामाला लागल्या आहेत. ‘सबका साथ...सबका विकास’चा नारा घुमवत महापालिकेतील सत्ताधारी भाजपने पुणेकरांसाठी आखलेल्या दीड डझन ‘प्रोजेक्ट्स’च्या फायलींचा गठ्ठा हातात घेऊन खासदार मेधा कुलकर्णी महापालिका आयुक्तांच्या पुढे बसणार आहेत. साऱ्या प्रकल्पांचा हिशेब घेऊन प्रशासनातील अधिकाऱ्यांसह पुण्याच्या माजी कारभाऱ्यांना ‘कामाला’ लावण्याचा मेधा कुलकर्णींचा इरादा असू शकतो. Medha Kulkarni Latest News

खासदार झाल्यानंतर महापालिकेच्या कामात लक्ष घालण्याच्या तयारीने मेधा कुलकर्णींनी महापालिका आयुक्तांकडे मीटिंगसाठी पत्र दिले. परंतु, बदलीच्या चर्चेने हैराण झालेल्या विक्रम कुमारांनी अजूनही मीटिंगसाठी वेळ काढलेला नाही. त्यामुळे मेधा कुलकर्णींचा पारा चढण्याची शक्यता आहे. विक्रम कुमारांच्या ‘मेसेज’ची वाट पाहणाऱ्या मेधा कुलकर्णी यांनी मंगळवारी दुपारी नवे जिल्हाधिकारी सुहास दिवसेंचे कार्यालय गाठून कामांचा पाढा वाचला. जिल्हाधिकारी कार्यालयानंतर आता त्या महापालिकेत धडकण्याची चिन्हे आहेत. महापालिकेच्या मीटिंगमध्ये मेधा कुलकर्णी या कोण्या कारभाराच्या काळातील, कोणत्या फायलींवर चर्चा करणार, याकडे आता साऱ्यांचे लक्ष राहणार आहे.

राज्यसभेच्या खासदारकीची जबाबदारी घेतल्यानंतर मंगळवारी मेधा कुलकर्णी Medha Kulkarni यांनी ' सरकारनामा'च्या Sarkarnama कार्यालयाला भेट दिली. या वेळी त्यांनी आगामी काळातील विविध योजना, पुणेकरांच्या हितासाठी केल्या जाणाऱ्या कामांची माहिती दिली.

पुणे महापालिकेत नगरसेवक म्हणून मेधाताई यांनी काम केलेले आहे. महापालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असताना विरोधी पक्ष म्हणून काम करणाऱ्या भाजपच्या अग्रेसिव्ह नगरसेविका म्हणून त्यांची ओळख होती. चुकीच्या विषयावर प्रसंगी स्वतःच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनादेखील खडेबोल सुनावण्यात त्या मागे पुढे पाहत नाहीत, असा त्यांचा स्वभाव आहे. नगरसेवक म्हणून त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत भाजपने त्यांना कोथरूड विधानसभेसाठी संधी दिली होती. मोठ्या मताधिक्याने त्या विजयी झाल्या होत्या.

Medha Kulkarni
Yashwant Sakhar Karkhana Election : शेतकरी विकास आघाडीनं मात्तबरांना घेरलं, प्रशांत काळभोरांनी विरोधकांना केला 'हा' सवाल

आमदार म्हणून जबाबदारी पार पाडताना शहरातील अनेक प्रश्नांवर त्यांनी विधानसभेत आवाज उठविला होता. पुणे शहराचा विकास आराखडा (डीपी प्लॅन), चांदणी चौकात Pune होणारी वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल, शहरातील वाढती गुन्हेगारी यासह अनेक प्रश्नांवर त्यांनी काम केले होते. त्यांच्या प्रयत्नांतून चांदणी चौकात उड्डाणपुलाचे काम पूर्ण झाले. आमदार म्हणून सतत चांगले काम केलेले असतानाही 2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट कापण्यात आले होते. मात्र, त्यानंतरदेखील कुलकर्णी Medha Kulkarni यांनी कोणतीही नाराजी व्यक्त न करता पक्षाचे आपले काम सुरू ठेवले होते.

राज्यसभेच्या खासदारकीची जबाबदारी मिळाल्यानंतर मेधाताई आता शहराच्या राजकारणात अॅक्टिव्ह झाल्या आहेत. पुणेकरांसाठी आखलेल्या महत्त्वाच्या आणि रखडलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यास त्यांनी आता सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची वेळ मागितली आहे. आयुक्तांनी वेळ दिल्यानंतर गेल्या पाच वर्षांत नागरिकांच्या फायद्यासाठी भाजपने BJP आखलेले प्रकल्प नक्की कोणामुळे रखडले हे समोर येणार असल्याने पालिकेतील अनेक जुन्या माननीयांची त्रेधातिरपीट उडणार आहे.

Edited By : Rashmi Mane

R

Medha Kulkarni
Pune Politics : अजित पवार यांच्यासोबतचे अनेक आमदार फुटणार; रोहित पवारांचा खळबळजनक दावा

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com