Supriya Sule : श्रीरंग आप्पांना खासदार सुळे भेटणार, कारण काय ?

Loksabha Election Result 2024 : श्रीरंग बारणे हे अतिशय चांगले खासदार आहेत. ते संसदरत्न आहेत.त्यांचा पार्लमेंटचा परफॉर्मन्स मी जवळून पाहिला आहे.ते खूप कमिटेड खासदार आहेत.
Shrirang Barne- Supriya Sule
Shrirang Barne- Supriya Sule Sarkarnama

Pune News : केंद्रीय मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर भाजपच्या मित्र पक्षांमध्ये मंत्रिपदाच्या वाटपावरून खदखद पाहायला मिळत आहे. मंत्रीपद वाटताना भाजपने शिवसेनेबरोबर एक न्याय आणि इतर पक्षांबरोबर एक न्याय असा दुजाभाव केल्याचं खासदार श्रीरंग बारणे यांनी बोलून दाखवला आहे. त्यांच्या या वक्तव्यावरती आता खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

शिवसेनेने एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद देण्याची मागणी भाजपच्या नेतृत्वाला केली होती. पण, त्यांना केवळ एक राज्यमंत्री पद देण्यात आले ते बुलढाण्याचे खासदार प्रताप जाधव यांना मिळाले. श्रीरंग बारणे म्हणाले, भाजपचा तथा 'एनडीए' तील जुना मित्र म्हणून एका कॅबिनेट आणि एका राज्यमंत्री पदाची अपेक्षा होती. पण, फक्त एकच राज्यमंत्रिपद दिले. तेथेही 35 व्या नंबरवर शपथ घ्यावी लागली, कॅबिनेट मंत्रिपद मिळाले असते, तर समाधान वाटले असते, असे ते म्हणाले होते.

याबाबत प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांना विचारला असता त्या म्हणाल्या, श्रीरंग बारणे हे अतिशय चांगले खासदार आहेत. ते संसद रत्न आहेत.त्यांचा पार्लमेंटचा परफॉर्मन्स मी जवळून पाहिला आहे. ते खूप कमिटेड खासदार आहेत. त्यामुळे त्यांच्या वेदना पूर्णपणे रास्त आहेत. कारण त्यांची मंत्रिपदाची मागणी ही मेरिट वरती आहे.त्यांच्याकडे मेरिट आहे. म्हणून ते मागणी करत आहे. खासदार जो संसद रत्न झालेला आहे. ज्याने कष्ट केले आहेत. ते एवढा संघर्ष करून निवडून आले आहेत. त्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळणे हा त्यांचा अधिकार आहे.असं त्यांना वाटत असेल त्यात गैर काहीच नाही.

Shrirang Barne- Supriya Sule
Supriya Sule: घर, पक्ष फोडणारे आता आकडेमोड करताहेत; सुप्रिया सुळेंचा रोख फडणवीसांकडे?

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणतात की एकच फॉर्मुला आहे. जो सर्व मित्र पक्षांना लागू केला आहे. मात्र तो फार्मूला या केस मध्ये दिसत नाही. श्रीरंग बारणे यांना भेटणार आहे. त्यांना मी बोलणार आहे की, भारतीय जनता पक्ष हा मित्र पक्षांची कसा वागतो याचा माझ्यापेक्षा जास्त अनुभव त्यांना आहे. अशी खोचक टीका देखील सुप्रिया सुळे यांनी केली. भाजप कसा आहे, हे त्यांना समजले असेल, असेही त्या म्हणाल्या.

(Edited by : Chaitanya Machale)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com