MPSC Protest : 'एमपीएससी'च्या आंदोलनातील तीन विद्यार्थ्यांनी मध्यरात्री उपोषण सोडलं, मोठं कारण आलं समोर

Students End Hunger Strike Hrishikesh Gangurde : पुणे पोलिसांनी विद्यार्थ्यांना तातडीने एस एम जोशी पूल परिसराचा भाग मोकळा करण्यास सांगितले होते. दरम्यान रात्री तीन विद्यार्थ्यांनी प्रकृतीच्या कारणाने उपोषण मागे घेतले आहे.
 MPSC Students End Hunger Strike
MPSC Students End Hunger Strikesarkarnama
Published on: 
Updated on: 

Pune MPSC Protest : पुण्यामध्ये सुरू असलेल्या MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, मात्र मध्यरात्री तीन विद्यार्थ्यांनी आपले उपोषण सोडले . उपोषण सोडण्यामागचे कारण हे त्यांच्या प्रकृतीवर परिणाम झाल्याचे सांगण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, उपोषणकर्त्या तीन विद्यार्थ्यांच्या किडनीवर परिणाम होण्याचा धोका असल्याने या विद्यार्थ्यांनी मध्यरात्री उपोषण सोडले.

आमदार विश्वजित कदम आणि विराज शिंदे या चिमुकल्याच्या हातून दूध घेऊन ऋषिकेश गांगर्डे, सोमनाथ चव्हाण आणि गजानन शेळके या तीन विद्यार्थ्यांनी आपले उपोषण सोडले.

पुणे पोलिसांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला परवानगी नाकारली होती. तसेच त्यांना तातडीने एस एम जोशी पूल परिसराचा भाग मोकळा करण्यास सांगितले होते, मात्र विद्यार्थ्यांनी आम्ही आंदोलन चालूच ठेवणार अशी भूमिका घेतली आहे. सात विद्यार्थी उपोषण करत होते. त्यातील तीन विद्यार्थ्यांनी आपले उपोषण मागे घेतले असले तरी, अजून चार विद्यार्थ्यांचे उपोषण सुरू आहे.

विद्यार्थी हे एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहेत. भीमनवार यांचा राजीनामा मागे घेतल्याशिवाय मागे हटणार नसल्याची त्यांची भूमिका आहे. दरम्यान या आंदोलनाला विविध राजकीय पक्षांचा देखील पाठिंबा वाढत आहे. विरोधी पक्षातील नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला भेट देत त्यांना पाठींबा व्यक्त केला.

आंदोलन अधिक तीव्र होणार...

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळतो आहे. विद्यार्थ्यांना आंदोलनस्थळावरून हटवण्या यावे यासाठी कोर्टात देखील याचिका करण्यात आली होती, मात्र कोर्टाने हस्तक्षेप करण्यात नकार देत आंदोलन करण्याचा विद्यार्थ्यांचा अधिकार असल्याचे म्हटले होते. दरम्यान, बुधवारी पोलिसांनी विद्यार्थ्यांना नोटीस देत एस एम जोशी परिसर रिकामा करण्यास सांगितले होते. तसेच आंदोलनाला परवानगी नाकारली होती. दरम्यान, विद्यार्थ्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com