MPSC Students Morcha : MPSC विद्यार्थ्यांचा एल्गार! सचिव, अध्यक्षांच्या राजीनाम्यावर ठाम, आज पुण्यात मोर्चा; काँग्रेसचा पाठिंबा

MPSC students protest in Pune: आज पुणे येथे हजारो विद्यार्थी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत, त्यांच्या मागण्या रास्त व स्पष्ट आहेत, असे मत काँग्रेस नेते नाना पटोले यांनी व्यक्त केले.
Congress support for MPSC students protest
MPSC students demand resignationSarkarnama
Published on
Updated on

MPSC students demand resignation: स्पर्धा परीक्षार्थींच्या विविध प्रश्नांवर आणि न्यायासाठी हजारो विद्यार्थ्यांच्या समवेत पुण्यात धडक मोर्चा निघणार आहे. पुण्यातील ओंकारेश्वर मंदिर चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा हा मोर्चा असणार असून पेपर फुटीमुळे MPSC चे अध्यक्ष, सचिवांच्या राजीनाम्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. विविध राजकी पक्षांकडून देखील या मोर्चाला पाठींबा मिळतो आहे.

काँग्रेस नेते नाना पटोले यांनी ट्विट करत म्हटले आहे की, या सरकारच्या कार्यकाळात MPSC संदर्भात, विशेषतः ड्रग इन्स्पेक्टर परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याच्या आरोपांसह, परीक्षा प्रक्रियेची पारदर्शकता व विश्वासार्हता याबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. सदर आरोपांची निष्पक्ष, स्वतंत्र व वेळबद्ध चौकशी करून वस्तुस्थिती जनतेसमोर आणणे तसेच दोषींवर कठोर कारवाई करणे ही सरकारची जबाबदारी आहे.'

'आज पुणे येथे हजारो विद्यार्थी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत, त्यांच्या मागण्या रास्त व स्पष्ट आहेत. परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता, निष्पक्ष चौकशी, वेळबद्ध भरती प्रक्रिया, गैरप्रकारांविरुद्ध कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांच्या मेहनतीला न्याय मिळावा एवढच त्यांचं म्हणणं आहे.', असे देखील त्यांनी सांगितले.

Congress support for MPSC students protest
OSD Ganesh Deore : MPSC पेपर फुटीच्या कनेक्शनचा आरोप, राष्ट्रवादीच्या मंत्र्याचा OSD आला समोर, स्पष्टच सांगितले, 'माझा संबंध...'

कारवाईची कालमर्यादा जाहीर करा

केवळ आश्वासनांद्वारे हा प्रश्न मार्गी लागणार नाही. या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधावा, त्यांच्या मागण्यांवर ठोस निर्णय घ्यावा आणि संबंधित निर्णयांच्या अंमलबजावणीसाठी निश्चित कालमर्यादा जाहीर करावी, अशी मागणी देखील पटोले यांनी केली आहे.

Congress support for MPSC students protest
MPSC Exam cancelled : MPSC ने घेतलेली परीक्षा रद्द, सुषमा अंधारेंच्या 'त्या' दोन प्रश्नांनी सरकारची अडचण; म्हणाल्या, 'नेमकं कोण...'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com