Mulshi Politics : मुळशीच्या आखाड्यात साहेब,दादा एकत्र येणार? ठाकरे-शिंदेचे शिलेदार स्वबळावर! राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेनाच लढत

NCP vs Shiv Sena : निवडणुकीचा नवा मुळशी पॅटर्न यंदाच्या जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकीत दिसून येईल. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चा सुरू असताना दोन्ही शिवसेना मात्र स्वतंत्र लढण्यावर ठाम आहे.
Leaders and workers of NCP and Shiv Sena campaigning for Mulshi Zilla Parishad and Panchayat Samiti elections
Leaders and workers of NCP and Shiv Sena campaigning for Mulshi Zilla Parishad and Panchayat Samiti electionssarkarnama
Published on
Updated on

ZP Elections : महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत जिल्हा परिषद निवडणूक आणि पंचायत समितीची निवडणूक पुढील आठवड्यात घोषित होण्याची शक्यता आहे. 50 आरक्षणाची मर्यादा पुणे जिल्हा परिषदेने ओलांडलेली नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्यात पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक होणार आहे. त्यातही बदललेली समीकरणांमुळे मुळशी तालुक्यातील निवडणुकीकडे विशेष लक्ष असणार आहे.

मुळशी तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांची ताकद आहे. मात्र, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्याचे पडसाद तालुक्यात देखील उमटले. त्यामुळे तालुक्यात सध्या दोन्ही राष्ट्रवादी आणि दोन्ही शिवसेना या निवडणुकीच्या मैदानात उतरण्यास सज्ज असल्याची चर्चा आहे. त्यातच महापालिकेमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या तशा जिल्हा परिषदेमध्ये देखील एकत्र येतील, अशी चर्चा सुरू असल्याने इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे.

मुळशी तालुक्यातील स्थानिक स्वराज संस्थावर राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांचे वर्चस्व दिसून येते. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रसचे उमेदवार शंकर मांडेकर हे विजयी झाल्याने यंदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला जास्त संधी असल्याची चर्चा आहे. त्यातच शिवसेनेची ताकद असली तरी दोन्ही शिवसेना एकत्र येतील, याची शक्यता फारच कमी आहे. त्या तुलनेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याची शक्यता जास्त असल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

Leaders and workers of NCP and Shiv Sena campaigning for Mulshi Zilla Parishad and Panchayat Samiti elections
Bjp News : विधानपरिषदेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी; पाच जागांसाठी मागितली 35 जणांनी उमेदवारी

जिल्हा परिषदेवर कोणाचा दावा?

पिरंगुट-भूगाव जिल्हा परिषद गटातून माजी जिल्हा परिषद सदस्य शांताराम इंगवले हे इच्छुक आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून येथून माजी पंचायत समिती सभापती महादेव कोंढरे यांनी शड्डू ठोकला आहे. त्यामुळे युती झाली तर कोण माघार घेणार यावरून घमासाण होण्याची शक्यता आहे. तोडगा न निघाल्यास बंडखोरीची शक्यताही नाकारता येत नाही.

शिंदेंची शिवसेना स्वबळावर

एकनाथ शिंदेंचे सहसंपर्क प्रमुख बाळासाहेब चांदेरे यांनी स्वबळाचा नारा दिला आहे. शिवसेनेची मुळशी, वेल्हे, भोर येथे ताकद आहे. त्यामुळे आमचे उमेदवार स्वबळावर लढतील, असे त्यांनी सांगितले. तसेच सुत्रांच्या माहितीनुसार, शिंदेंच्या शिवसेनेचे उमेदवार यादी तयार असून बंडखोरी टाळण्यासाठी ती निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रसिद्ध केली जाईल, असे समजते. चांदेरे यांनी स्पष्ट केले की, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबत मुळशीमध्ये युती होणार नाही.

ठाकरेंची शिवसेना तयारीत

शिवसेनेची ताकद मुळशी तालुक्यात आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेकडून देखील सर्व जागा लढण्याची तयारी करण्यात आली आहे. अविनाश बलकवडे हे इच्छुक आहेत. तालुका प्रमुख सचिन खैरे हे देखील जिल्हा परिषदेच्या निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत, पौड- आंबडवेट गटात त्यामुळे चुरूस उमेदवारीसाठी चुरस असणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून या गटात बाबा कंधारे हे मैदान असण्याची शक्यता आहे.

Leaders and workers of NCP and Shiv Sena campaigning for Mulshi Zilla Parishad and Panchayat Samiti elections
Kolhapur News: कोल्हापुरात पुढच्या 24 तासांत मोठा राजकीय भूकंप, हादरा 'गोकुळ'मध्येही बसणार; बडा नेता शिवसेनेच्या वाटेवर

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com