Mulshi Voter List Controversy : मुळशीत 'मत' नव्हे मतदारच गेले चोरीला! थेट कोथरुडमध्ये समावेश; ठाकरेंच्या शिवसेना प्रचंड आक्रमक

Mulshi Voter List Shiv Sena UBT : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने मुळशीच्या तहसीलदारांना निवेदन देत मुळशीतील धरणग्रस्त भागातील मतदारांच्या नावे मतदारयादीतून गायब झाल्याचे निर्देशनास आणून दिले आहे.
Voter List
Voter List Sarkarnama
Published on
Updated on

Mulshi Politics : राहुल गांधी यांनी मत चोरीचा मुद्दा उपस्थित करून निवडणूक आयोगावर निशाणा साधला होता. आगामी स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मत चोरीच्या मुद्यावर राजकीय पक्ष सावध होत असताना मुळशी तालुक्यातील धरणग्रस्त भागातील मतदारच चोरल्याच प्रकार उघडकीस आला आहे.

मुळशी धरणग्रस्त भागातील तब्बल 988 मतदारांची नावे मतदार यादीतून गायब करण्यात आली. या मतदारांच्या नावाचा समावेश कोथरुड भागामध्ये नवीन मतदार म्हणून करण्यात आला. मतदारांची नावे परस्पर कोथरुडमध्ये समावेश केल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष प्रचंड आक्रमक झाला. त्यांनी तहसीलदारांना निवेदन देत थेट आंदोलन छेडण्याचा इशारा दिला.

धरणग्रस्त भागातील मतदार हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मतदार समजला जातो. शिवसेनेत फूट पडली त्यावेळी धरणग्रस्त भागातील शिवसैनिक ठाकरेंसोबत एकनिष्ठ राहिला. ऐन जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या आधी ठाकरेंच्या काही पदाधिकाऱ्यांकडून मतदार यादी चेक करत असताना आपल्या भागातील मतदारांची नावे गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी ही बाब तालुक्यातील वरिष्ठ नेत्यांच्या कानावर घातली.

Voter List
Honey Trap Case Video : सगळ्यात शेवटी निवडून आलेल्या भाजप आमदाराभोवती हनी ट्रॅपचं जाळं : वर्षभरापासून रचलेला कट उधळला

कार्यकत्यांनी सखोल माहिती घेतली असता 988 मतदारांची नावेच गावातून गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. गायब झालेल्या नावांमध्ये वांद्रे आणि आदरवाडीतील प्रत्येकी १०९, बार्पे 91, वडगाव 50, वाघवाडी 15, ताम्हिणी 44, ढोकळवाडी 35 मतदारांचा समावेश आहे. त्यामुळे गावामधील मतदार चोरणार कोथरुडमधील कार्यकर्ता नक्की कोण याचा शोध घेण्याची देखील मागणी होत आहे.

मुळशीचे तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी सांगितले की, गावच्या यादीतून मतदारांची नावे वगळल्याच्या तक्रारी आल्या आहेत. ज्यांची नावे वगळली गेली आहेत, त्यांचा अर्ज क्रमांक सहा भरून घेऊन योग्य ते पुरावे घेऊन ही नावे पुन्हा गावच्या यादीत घेण्याची कार्यवाही करणार आहे.

Voter List
Bapu Pathare: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आमदाराच्या विरोधात गुन्हा; अजित पवार समर्थकाच्या तक्रारीवरुन कारवाई

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com