Mulshi Zilla Parishad election result 2026 live updates: जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मुळशी तालुक्यात भाजपची एन्ट्री झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार हिरामण मांडेकर यांच्या घरचे मैदान असणाऱ्या हिंजवडी गटात भाजपचे शिवाजी बुचडे तर हिंजवडी गणात ऐश्वर्या वाघमारेहे भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसमधील मतविभागणी ही शेळकेंसाठी फायदेशीर ठरेल अशी शक्यता होती. मात्र भुगाव पिरंगूट गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शांताराम इंगवले यांनी जोरदार लढत देत विजय मिळवला. त्यांनी ठाकरेंच्या उमेदवार आबा शेळके यांचा पराभव केला.
पौड अंबटवेटमध्ये घड्याळाचा गजर
पौड-अंबटवेट गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या काजल मोरे या 2145 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीची माजी सभापती कोमल वाशिवले यांचा पराभव केला. काजल मोरे यांना 6143 तर, कोमल वाशिवले यांना 3998, पल्लवी कंधारे यांना 3213 मतं मिळाली.
जिल्हा परिषद गटात सुरुवातीच्या आकडेवारीनुसार राष्ट्रवादीचे काँग्रेसचे मिलिंद वाळुंज सुरुवातीच्या कलापासून आघाडीवर होते. त्यांनी ठाकरेंचे उमेदवार अविनाश बलकवडे यांचा 5 हजार 297 मतांनी पराभव केला.
माण गणात राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंदा शेळके यांनी विजय मिळवला आहे. त्यांना 5997 मंतं मिळाली तर, भाजपच्या युगंधरा पारखी यांना युगंधरा पारखी 33O5 मतं मिळाली. ठाकरे गटाच्या कल्पना भेगडे यांना 3521 मतं मिळाली. तर, अपक्ष रुपाली बोडके यांनी चांगली लढत दिली त्यांना 3670 मतं मिळाली.
हिंजवडी गट -शिवाजी बुचडे पाटील (भाजप)
भुगाव-पिरंगूट - शांताराम इंगवले (राष्ट्रवादी काँग्रेस)
पौड-आंबटवेट -मिलिंद वाळंज (राष्ट्रवादी काँग्रेस)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.