Murlidhar Mohol : मोहोळांची पवारांसोबतची राजकीय ‘कुस्ती’ खेळीमेळीत; शेट्टींना मात्र ललकारले...

Murlidhar Mohol’s Political Equation with Ajit Pawar : राजू शेट्टी यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली. त्याआधारे त्यांनी माझ्यावरती टीका केली. त्यांनी माझ्याकडून याबाबत माहिती घ्यायला हवी होती, असे मुरलीधर मोहोळ म्हणाले.
Murlidhar Mohol, Ajit Pawar, Raju Shetti
Murlidhar Mohol, Ajit Pawar, Raju ShettiSarkarnama
Published on
Updated on

Pune News : केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्याशी भागीदारी असलेल्या गोखले कंन्स्ट्रक्शन कंपनीने पुण्यातील मोक्याची 3 हजार कोटीची जागा 230 कोटीला हडप केल्याचा गंभीर आरोप माजी खासदार राजू शेट्टी यांनी केला होता. त्या आरोपांना खासदार मुरलीधर मोहोळ यांनी उत्तर दिले आहे. त्यांनी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेच्या निवडणुकीवरही भाष्य केले आहे.

काय म्हणाले होते राजू शेट्टी?

जैन समाजाच्या पुण्यातील मोर्चादरम्यान राजू शेट्टी म्हणाले होते की, मुरलीधऱ मोहोळ तुम्ही पैलवान आहात, पण मी कोल्हापूरचा आहे. जो जो आडवा येईल, त्याला तुडवल्याशिवाय सोडणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला होता. पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना मुरलीधर मोहोळ म्हणाले यांनी शेट्टींना प्रत्युत्तर दिले.

राजू शेट्टी यांना कोणीतरी चुकीची माहिती दिली. त्याआधारे त्यांनी माझ्यावरती टीका केली. त्यांनी माझ्याकडून याबाबत माहिती घ्यायला हवी होती. त्यांनी तसं केलं असतं तर आरोप केले नसते. मात्र तरी देखील मला त्यांच्याबाबत कोणताही आकस नाही, असे मोहोळ म्हणाले.

Murlidhar Mohol, Ajit Pawar, Raju Shetti
Thackeray brother alliance : ठाकरेंची 4 in 1 युती... भाजप नेता म्हणतो, झिरो रिझल्ट... डिपॉझिट गेलं, इज्जत गेली…

राजू शेट्टी यांनी मोहोळ यांना आडवं करण्याची भाषा केली होती त्यावर बोलताना मोहोळ म्हणाले, मी कुस्ती केलेली आहे. मी कोल्हापूरला होतो. कुस्ती दोन प्रकारची असते एक खरी कुस्ती आणि दुसरी नुरा कुस्ती असते. राजू शेट्टी हे मात्र नुरा कुस्तीचे पैलवान वाटतात, असा टोला मोहोळ यांनी लगावला.

Murlidhar Mohol, Ajit Pawar, Raju Shetti
Murlidhar Mohol : बिळात बसलेला उंदीर बाहेर आला अन्..! जमीन प्रकरणावर मोहोळांचा मोठा खुलासा, धंगेकरांच्या ‘बॉम्ब’ची वात विझवली... 

माहिती घेऊन राजू शेट्टींनी खरी कुस्ती करावी, मी त्यासाठी तयार आहे. नुरा कुस्ती करू नका. नुरा कुस्तीने काहीही होत नाही. नुरा कुस्ती आणि खरी कुस्ती मधला फरक पुणेकरांना आणि कोल्हापूरकरांना देखील माहित आहे, अशी टीका मोहोळ यांनी केली.

महाराष्ट्र ऑलम्पिक अध्यक्ष पदासाठी होणाऱ्या निवडणुकीत मुरलीधर मोहोळ विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार अशी लढत होणार आहे. याबाबत विचारला असता मोहोळ म्हणाले, निवडणुकीत त्यांचे आणि आमचे लोक देखील उभे आहेत. खेळ वेगळा आहे आणि महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती वेगळी आहे. त्यामुळे ही निवडणूक खेळीमेळीच्या वातावरणात होईल, असं मोहोळ म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com