Modi 3.0 Ministers Get Calls Ahead Of Swearing : पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय सरकारमध्ये 25 वर्षानंतर पुणे शहराला मान मिळणार आहे. पहिल्यांदाच निवडून आलेले मुरलीधर मोहळ यांना मंत्रिपद मिळणार आहे. नगरसेवक, स्थायी समिती, महापौर, पदानंतर मोहळ यांना केंद्रात मोठं पद मिळाले. मोहोळ यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात कोणते खाते मिळणार याची चर्चा आहे.
मोदी सरकारमधील संभाव्या मंत्र्यांना फोनाफोनी झाल्या त्यातच मोहोळ यांना फोन आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे. पुणे शहरातून खासदार म्हणून निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीला मोठ्या कालावधीनंतर मंत्रिपदावर संधी मिळणार आहे. पुणेकर प्रकाश जावडेकर यांना मंत्रिपदाची संधी मोदी सरकार -2 मध्ये मिळाली होती. मात्र, ते राज्यसभेवर निवडून गेले होते. ते देखील मध्य प्रदेशमधून.
नरेंद्र मोदी संध्याकाळी सव्वासात वाजता राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहे. त्यापूर्वी मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या खासदारांना फोना-फोनी सुरू झाली आहे. पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना फोन आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
मुरलधी मोहोळ यांच्यासोबतच रावेतच्या खासदार रक्षा खडसे, नितीन गडकरी, रामदास आठवले, प्रतापराव जाधव यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यासाठी फोन आल्याचे सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.