
Pune News : प्रयागराजमध्ये महाकुंभमेळ्याला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आहे.या कुंभमेळ्यासाठी देश-विदेशातून मोठ्या संख्येने प्रयागराज येथे भाविक दाखल झाले आहे.पण एकीकडे 12 वर्षांनी होत असलेल्या कुंभमेळ्यात सहभागी होण्यासाठी भाविकांची धडपड सुरु असतानाच दुसरीकडे प्रयागराजसाठी जाणाऱ्या विमानांच्या तिकीटदरात विमान कंपन्यांनी अचानक प्रचंड दरवाढ केली. या वाढलेल्या तिकीटदरांमुळे भाविकांची मोठी नाराजी सुरु असतानाच आता केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ(Murlidhar Mohol) यांनी मोठं विधान केलं आहे.
केंद्रीय हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी प्रयागराजकडे उड्डाण घेणार्या विमानांच्या वाढलेल्या तिकीटदरावर भाष्य केलं आहे. त्यांनी प्रयागराजसाठी जाणाऱ्या विमानांच्या तिकीटदरात विमान कंपन्यांनी केलेल्या प्रचंड दरवाढीचं मोहोळ यांनी समर्थन केलं आहे.
मोहोळ म्हणाले,प्रस्थानाची तारीख जवळ येते,तशी डायनॅमिक भाडेप्रणाली आपोआप भाडे वाढवते. मात्र,ही भाडेवाढ किमान आणि कमाल दराच्या आत आहे. सर्व शेड्युल्ड डोमेस्टिक एअरलाइन्स त्यांच्या वेबसाइट्स अद्ययावत करत असतात. त्यात नवीन भाडे इकॉनॉमी आणि बिझनेस क्लाससाठी ऑफर केले जाते,त्याची प्रत DGCA कडे पाठवली जात आहे.
महाकुंभमेळ्यासाठी (Mahakumbha Mela) प्रयागराजला जाणाऱ्या विमानभाडे सर्व क्षेत्रांतील टॅरिफ मॉनिटरिंग शीटनुसार किमान आणि कमाल मर्यादेत आहे.याबाबतचे सक्षम अधिकारी दैनंदिन निरीक्षण करत आहेत, असंही मंत्री मोहोळ यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटलं आहे.
प्रयागराज येथे महाकुंभमेळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी आधीच भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. आता आधी खिशाचाही विचार करावा लागतो. रेल्वे, बस आणि विमानाच्या तिकीटदरात मोठी वाढ झाल्याने इच्छा असतानाही भाविकांना प्रयागराजचा मार्ग खडतर वाटू लागला आहे.
नागपूर ते प्रयागराज महामार्गावरुन जाणाऱ्यांसाठी अनेक रेल्वेगाड्या फुल्ल आहेत.त्यामुळे विमान प्रवासाच्या विचार करणाऱ्यांना मोठा आर्थिक झटका बसण्याची शक्यता आहे. नागपूर ते प्रयागराज विमान प्रवासासाठी 8 ते 9 हजार खर्च येतो, तिथे आता 32 ते 35 हजार रुपयांपर्यंत तिकीट दर वाढवण्यात आला आहे. 23 आणि 29 जानेवारी रोजी महाकुंभमेळ्यातील विशेष पर्वणी असल्यामुळे या काळातील तिकीट दर ३२ हजार ते ३५ हजार इतका आहे.
दर बारा वर्षांनी महाकुंभमेळा हा आयोजित करण्यात येतो.त्या गंगा,यमुना आणि सरस्वती या तीन नद्यांच्या संगमावर याचं विशेष मह्त्व आहे.महाकुंभमेळ्यात लाखो भाविक सहभागी होतात. महाकुंभमेळा हा जगभरातील सर्वात मोठा धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव मानला जातो. कुंभमेळ्याची परंपरा भारतात शेकडो वर्षांपासून आहे.या कुंभमेळ्याला जगभरातून कोट्यावधी भाविक हजेरी लावतात.
भारतातील प्रयागराज,नाशिक,उज्जैन आणि हरिद्वार या चार ठिकाणी महाकुंभमेळ्याचे आयोजन केले जाते. साधू संत आणि भक्त या पवित्र स्थानांवर होणाऱ्या महान उत्सवाची आतुरतेने वाट पाहत असतात
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.