Namdevrao Jadhav : राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी नामदेवराव जाधवांच्या तोंडाला फासलं काळं!

Namdevrao Jadhav Vs NCP : पुण्यात प्रसारमाध्यमांशी नामदेवराव जाधव बोलत असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केलं.
Namdevrao Jadhav
Namdevrao JadhavSarkarnama
Published on
Updated on

Pune News : शरद पवारांच्या जात प्रमाणपत्रावर कुणबी नोंद असल्याचं नामदेवराव जाधव यांनी म्हटलं होतं. त्यानंतरही शरद पवारांबाबत जाधव यांनी वक्तव्य केलं होतं, यावरून शनिवारी पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या संतप्त कार्यकर्त्यांनी नामदेवराव जाधवांच्या तोंडाला काळं फासलं.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Namdevrao Jadhav
Shivendra Raje Bhosale:"...याचा अर्थ ओबीसी नेते मराठा समाजाला मानत नाहीत का? "; शिवेंद्रराजेंनी भुजबळांसह, वडेट्टीवारांना फटकारलं

पुण्यातील भांडारकर इन्स्टिट्यूटमध्ये नामदेवराव जाधव हे एका कार्यक्रमास उपस्थित राहणार होते. परंतु या कार्यक्रमास कायदा आणि सुव्यवस्थेच्या कारणास्तव भांडारकर इन्स्टिट्यूटकडून परवानगी नाकारली गेली होती. त्यानंतर नामदेवराव जाधव हे प्रसारमाध्यमांना प्रतिक्रियादेण्यासाठी नवी पेठेतील पत्रकार भवनात गेले होते.

याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना मिळाल्याने ते पत्रकारभवनाजवळ जमले आणि नामदेवराव जाधव प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत असताना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या तोंडाला काळे फासले. या ठिकाणी उपस्थित पोलिसांनी तत्काळ नामदेवराव जाधव यांनी संरक्षण दिल्याने पुढील अनर्थ टळला.

Namdevrao Jadhav
Swabhimani Protests : ऊसदराचं आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रात पेटणार; स्वाभिमानीचे उद्या राज्यभरात चक्काजाम

 शरद पवार दिल्लीत मराठा म्हणून मिरवतात, तर महाराष्ट्रात मराठ्यांची जिरवतात, अशी टीका जाधव यांनी केली होती. 

याशिवाय शरद पवार यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत त्यांच्या तोंडाला काळं फासलं.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com