Pune News, 22 June : भाजपाच्या कार्यकर्त्यांना सदबुद्धी यावी म्हणून शंकर महाराज मठात जावून काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी क्षमा प्रार्थना व भजन केले. मठातील मारहाण प्रकरणी भाजपच्या नेतृत्वाने भक्तांची, पुणेकरांची माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.
दोन दिवसांपूर्वी मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) हे शंकर महाराज मठात दर्शनासाठी आले होते. यावेळी भारतीय जनता पक्षाचे दोन माजी नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. या घटनेचा निषेध करण्यासाठी धंगेकर यांच्याकडून मठात क्षमा प्रार्थना करण्यात आली.
या प्रकरणावर बोलताना धंगेकर (Ravindra Dhangekar) म्हणाले, कुठलेही मंदिर, मठ हे मन:शांतीचे आध्यात्मिक केंद्र असते. एक पवित्र स्थान असते. प्रत्येकाला ऊर्जा देणारे केंद्र असते. अशा पवित्र ठिकाणी यापूर्वी राजकीय कार्यकर्त्यांनी हाणामारी केल्याच्या घटना घडल्या नाहीत. पुण्यातील ही घटना निषेधार्ह अशीच आहे. शिवाय, पुण्यातील आजवरच्या सुसभ्य राजकीय वातावरणाला काळीमा फासणारीही आहे. भाजपाच्या कार्यकर्त्यांना सदबुद्धी यावी म्हणून आम्ही मठात प्रार्थना केल्याचं धंगेकर म्हणाले.
तसंच, मठासारखे पवित्र स्थान असताना अशा प्रकारची शिवीगाळ करण्यात आली. हा सर्व प्रकार घडला तेव्हा अनेक भक्त मठात उपस्थित होते. त्यांनादेखील नाहक त्रास झाला. एवढे होऊनही भाजपच्या (BJP) नेतृत्वाने या घटनेबद्दल साधा खेद व्यक्त केला नाही, हे निषेधार्ह आहे. या घटनेमुळे भक्तांच्या भावनेला धक्का पोहचला आहे.
भाजप नेतृत्वाने या घटनेबद्दल भक्तांची, पुणेकरांची माफी मागितली पाहिजे, मठातील सीसीटीव्ही तपासून मारहाणीत सहभागी असलेल्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशी मागणीही धंगेकर यांनी यावेळी केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.