Nana Patole News : जरांगेंनी आम्हालाही शिव्या घातल्या, मग फडणवीसांना बोलल्यानंतरच सरकारला जाग का ? पटोलेंचा सवाल

Manoj Jarange Patil : मनोज जरांगे-पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सरकारला सवाल केला.
Nana Patole and Devendra Fadnavis
Nana Patole and Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

Pune News : मराठा आरक्षणाबाबत मनोज जरांगेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर गंभीर आरोप केले आहेत. शिवराळ भाषेत काही वक्तव्यंदेखील केली आहेत. तसेच मराठा समाज निवडणुकीत फडणवीस आणि भाजपला जागा दाखवून देईल, असा निर्वाणीचा इशाराही जरांगेंनी दिला आहे. यावर आता सरकार आणि विरोधी पक्षांकडून विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पत्र व्हायरल होत आहे. मात्र, अजित पवारांनी कितीही पत्र व्हायरल केलं तरी जनतेला हे पचनी पडणार नाही. त्यांना याची फळं भोगावी लागणारच आहेत. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी जसे चहाची स्टोरी सांगायचे आता तसं अजित पवार अंडी विक्री करत होते, अशी स्टोरी सांगताहेत. मात्र, जनता आशा भूलथापांना बळी पडणार नाही, असं सांगत नाना पटोले यांनी खोचक टोला लगावला. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Nana Patole and Devendra Fadnavis
Raksha Khadse News : दोन दिवसांतच रक्षा खडसेंचा 'त्या' विधानावरून यूटर्न; आता म्हणाल्या,'एकनाथ खडसेंना...'

देवेंद्र फडणवीसांचे मराठा समाजावर उपकार आहेत, असं भाजपचे आमदार सांगत आहेत. मात्र, उपकार कोणाचे कोणावरती आहेत, हे निवडणुकीमध्ये समजेल. एकीकडे ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा धक्का लावण्यात आला, तर दुसरीकडे मराठा समाजाला 2018 मध्ये जो आरक्षणाचा लॉलीपॉप दाखवण्यात आला होता, तोच लॉलीपॉप आत्तादेखील दाखवण्यात आला आहे. त्यामुळे हा खोटारडेपणा जास्त काळ चालणार नाही, असा इशारा नाना पटोले (Nana Patole) यांनी दिला.

जरांगे पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावरदेखील पटोले यांनी प्रतिक्रिया देत जरांगे पाटील यांची शिवराळ भाषा आजची नाही. त्यांनी जेव्हापासून आंदोलन सुरू केले, तेव्हापासून ते मंत्री छगन भुजबळ, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, त्याचबरोबर आम्हालादेखील शिव्या घातल्या आहेत. मात्र, आता देवेंद्र फडणवीस यांना शिव्या घातल्यानंतर सरकारला का जाग आली ? असा सवाल उपस्थित करत आम्ही काय माणसं नाही का ? असा सवाल करत शिव्या दिल्या याचे आम्ही समर्थन करत नाही, पण चित्र कसं आणि का बदलले हे सर्वांसमोर आहे, असे पटोले म्हणाले.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे गृहमंत्री आहेत. आज ड्रग्जमाफियाचे जाळे पसरले आहे. ड्रग्जमाफिया काय जावई आहेत का ? गुटखा विक्री होते, विक्री करणारे जावई आहेत का ? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच आगामी लोकसभा निवडणुकीबाबत मंगळवारी महाविकास आघाडीची बैठक होणार असून, प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांना उद्या शक्य नसल्यास त्यांना 28 फेब्रुवारीला आम्ही पुन्हा बोलू, असं ते म्हणाले.

(Edited By-Ganesh Thombare)

R

Nana Patole and Devendra Fadnavis
Manoj Jarange News : मनोज जरांगे यांचा मोठा इशारा; म्हणाले, 'हे सरकार 12-13 दिवसांचेच, नंतर...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com