Operation Tiger 3: ठाकरेंचे नगरसेवक फोडण्यासाठी शिंदेंनी नेमलेला 'एजंट' कोण? नाशिकचे नगरसेवक घेताहेत शोध

Nashik Operation Tiger News: ठाकरेच्या नगरसेवकांना पाच कोटी रुपये विकास निधीचे आम्ही नगरसेवकांना दिले आहे. त्यासाठी शिवसेनेच्या शिंदे पक्षाने एजंट नेमले आहे. हे एजंट नगरसेवकांची भेट घेत असल्याचा आरोप आहे.
Nashik Operation Tiger News
Nashik Operation Tiger NewsSarkarnama
Published on: 
Updated on: 

Shiv Sena Nashik News: राज्यात ठिकठिकाणी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आपली सर्व शक्ती उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या नेत्यांना फोडण्यात लावत आहे. नाशिकमध्ये नगरसेवकांसाठी तसे प्रयत्न चर्चेत आहेत. त्यावरून दोन्ही पक्षांत चांगलीच जुंपली आहे.

शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे 12 नगरसेवक शिवसेनेच्या शिंदे गटात जाणार अशी चर्चा शुक्रवारी सुरू झाली. त्यासाठी एजंट नेमण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरे पक्षाचे गटनेते केशव पोरजे यांनी केला. पोरजे यांच्या आरोपात किती तथ्य यावरून नवा वाद उभा राहिला आहे.

पोरजे यांनी नगरसेवकांना पाच कोटी रुपये विकास निधीचे आम्ही नगरसेवकांना दिले आहे. त्यासाठी शिवसेनेच्या शिंदे पक्षाने एजंट नेमले आहे. हे एजंट नगरसेवकांची भेट घेतल्याचा दावा आहे. या आरोपानंतर अनेक नगरसेवकांना एजंट कोण याची उत्सुकता लागली आहे.

दोन्ही शिवसेनेच्या नेत्यांनी परस्परांवर आरोप प्रत्यारोप सुरू केले. यामध्ये महायुतीचा घटक पक्ष आणि बहुमता पेक्षाही अधिक संख्या असलेल्या भाजपचे वेगळेच प्रयत्न आहेत. महासभेत आणि जाहीरपणे शिवसेना उद्धव ठाकरे हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. मात्र भाजपने विरोध नको म्हणून थेट वरिष्ठ नेत्यांपासून फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे.

Nashik Operation Tiger News
Teacher News: अल्पसंख्याक शैक्षणिक संस्थांना मोठा दिलासा! शिक्षक-शिक्षकेतर नियुक्त्यांना महिनाभरात मंजुरी

शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे महापालिकेत 26 नगरसेवक आहेत. यातील अनेक नगरसेवकांना प्रभागात काम करताना वेगळ्याच अडचणींना सामोरे जावे लागत आहे. नगरसेवकांना अद्याप कोणत्याही ठोस स्वरूपाच्या कामांची संधी मिळालेली नाही. त्यासाठी भाजपकडून कोंडी केली जात असल्याची त्यांची तक्रार आहे.

शिवसेना एकनाथ शिंदे पक्ष उद्धव ठाकरे पक्षातून येणाऱ्या नगरसेवकांना पाच कोटींचा निधी कसा देणार? हा राजकीय पेज आहे. सर्व सूत्रे भाजपच्या आणि प्रामुख्याने थेट संकट मोचकांच्या हाती आहेत. महापालिकेतील कारभार पाहता नगरसेवकांना सध्या तरी कोणतेही स्वातंत्र्य नाही अशी स्थिती आहे. त्यामुळे दोन्ही शिवसेनेतील सध्याचा वाद म्हणजे "बाजारात तुरी..." असा असल्याचा दावा एका भाजप नेत्यांनी केला आहे.

Nashik Operation Tiger News
Ashadhi Wari : पुण्यात मुक्कामी वारकऱ्यांचे साहित्य शाळेतून बाहेर फेकले, पाण्याविना घसाही कोरडा : महापालिकेच्या कारभारामुळे अतोनात हाल

सध्या महापौर आणि स्थायी समिती सभापती ही दोन्ही महत्त्वाची पदे भाजपकडे आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाशी भाजपचे पडद्यामागून चांगलेच सूत्र जुळले आहे. महापौर निवडणुकीतही ठाकरे पक्षाकडून विद्यमान महापौरांना अनुकूल अशीच भूमिका घेतली गेली होती. या स्थितीत एकनाथ शिंदे पक्षाचा एजंट कोण? आणि नगरसेवकांना पाच कोटींचा निधी देणार तरी कसा? या प्रश्नांचे उत्तर सगळ्यांनाच गोंधळात टाकणारे आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

Uddhav Thackeray vs Eknath Shinde Supreme Court
Nashik Municipal Corporation
Suhas Kande Strategy
14 MLAs join Eknath Shinde Shiv Sena
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com