Nasrapur Girl Case : नसरापूर पीडित वडिलांचे राजकारणांना हात जोडून विनंती, 'आधी न्याय द्या, मगच भेटायला या'

Nasrapur Incident Victim Father Appeal to Politicians : भाजप खासदार मेधा कुलकर्णी, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह इतरही नेते आज पीडित कुटुंबाची भेट घेणार होते
The victim’s father in the Nasrapur case makes an emotional appeal to political leaders, asking them to avoid visits until justice is ensured.
The victim’s father in the Nasrapur case makes an emotional appeal to political leaders, asking them to avoid visits until justice is ensured.sarkarnama
Published on
Updated on

Pune News : नसरापूर येथे झालेल्या चिमुरडीच्या हत्या प्रकरणाने सबंध महाराष्ट्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर नसरापूर मधील नागरिक आणि चिमुरडीचे कुटुंबीय प्रचंड रोष पाहायला मिळत आहे.

चिमुरडीला तातडीने न्याय मिळावा यासाठी काल देखील नवले ब्रिज येथे राष्ट्रीय महामार्ग थांबवत आंदोलन करण्यात आले. त्यानंतर आज नसरापूरसह भोर बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच विविध ठिकाणी या घटनेच्या निषेधार्थ आंदोलन देखील करण्यात येत आहेत.

या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजकीय मंडळी पीडीत कुटुंबीयांची आणि नागरिकांची भेट घेताना पाहायला मिळत आहेत. मात्र आता पीडित बालिकेच्या कुटुंबाने कोणत्याही राजकीय पुढाऱ्यांनी त्यांना न भेटण्याचा निर्णय घेतला आहे.

याबाबत बोलताना पीडीतीच्या वडील म्हणाले, आम्ही अस्थि विसर्जनासाठी देहू येथे जात आहोत. याच दरम्यान माझ्या कुटुंबीयांचा आणि मित्रमंडळींचा फोन येत आहे. की त्या ठिकाणी बरेचशे राजकारणी मंडळी सांत्वन करण्यासाठी आणि भेटीसाठी येत आहेत. मात्र जोपर्यंत माझ्या मुलीला योग्य तो न्याय मिळत नाही. त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत एकही राजकारण्याने माझ्या घरी आम्हाला भेटायला येऊ नये ही माझी विनंती आहे. जोपर्यंत त्या नराधमाला फाशी होत नाही तोपर्यंत कोणत्याही नेत्यांनी माझं सांत्वन करायला घरी येऊ नका, अशी भूमिका या पिढीत मुलीच्या वडिलांनी व्यक्त केली.

The victim’s father in the Nasrapur case makes an emotional appeal to political leaders, asking them to avoid visits until justice is ensured.
Maharashtra News Live Update: पोलिसांनी आंदोलकांना हटवलं, चार तासांनंतर मुंबई-बंगळूरु महामार्गावरील वाहतूक सुरू

ही घटना समोर आल्यानंतर शनिवारी नसरापूर गावातील ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात निषेध व्यक्त केला. तसंच आंदोलन देखील करण्यात आलं. यावेळी स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांच्यासह माजी आमदार संग्राम थोपटे यांनी ग्रामस्थांची भेट घेतली. त्यानंतर खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे देखील घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी कुटुंबीयांची आणि नागरिकांची भेट घेऊन सांत्वन केलं होतं.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील पीडित बालिकेच्या वारजे येथील घरी जाऊन कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यावेळी त्यांनी कुटुंबीयांचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलणं करून दिलं मुख्यमंत्र्यांनी कोठारातील कठोर शिक्षा आरोपीला करण्यासाठी पूर्ण सहकार्याचा आश्वासन दिले.

यानंतर आज देखील विविध नेते मंडळी या कुटुंबाच्या भेटीला जाणार आहेत. यामध्ये भाजप खासदार मेधा कुलकर्णी, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, मंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह इतरही नेते आज कुटुंबाची भेट घेणार होते.मात्र त्यापूर्वीच पीडित बालिकेच्या वडिलांनी मुलीला न्याय मिळत नाही तोपर्यंत राजकीय व्यक्तींनी आमच्या कुटुंबाला भेटायला येऊ नये" अशी विनंती केली आहे.

The victim’s father in the Nasrapur case makes an emotional appeal to political leaders, asking them to avoid visits until justice is ensured.
Nasrapur girl case : 'महिलांसाठी हा काळ काळरात्र'; पुण्यातील नसरापूर इथल्या घटनेवरून विजय वडेट्टीवारांचा संताप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com